वृद्ध शेतकऱ्यांना पेन्शन देण्याचा ठराव

By admin | Published: June 17, 2014 01:28 AM2014-06-17T01:28:36+5:302014-06-17T01:28:36+5:30

कृषी सभापती : राज्यातील सर्व जि.प.नी ठराव करावेत

Resolution of giving pension to old farmers | वृद्ध शेतकऱ्यांना पेन्शन देण्याचा ठराव

वृद्ध शेतकऱ्यांना पेन्शन देण्याचा ठराव

Next


सोलापूर: वृद्ध शेतकऱ्यांना पेन्शन सुरू करण्याचा ठराव जिल्हा परिषद कृषी समितीच्या बैठकीत करण्यात आला. राज्यातील सर्व जिल्हा परिषदांनी ठराव करुन केंद्राकडे पाठवावा, असे आवाहन सभापती जालिंधर लांडे यांनी केले आहे.
सोलापूर जि.प. कृषी समितीची बैठक सभापती लांडे यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी झाली. आयुष्यभर शेतीवर काबाडकष्ट करणाऱ्या शेतकऱ्यांना वृद्धत्व आल्यानंतर सांभाळ करणाऱ्या मुलांचे प्रमाण कमी होत आहे. यामुळे पोटाला अन्न मिळणे कठीण होत आहे. असे असल्याने वृद्ध शेतकऱ्यांना पेन्शन सुरू करावी, असा ठराव सभापती लांडे यांनी मांडला. हा ठराव सर्वच सदस्यांनी एकमताने मंजूर केला. अशाच पद्धतीचे ठराव प्रत्येक जि.प. कृषी समितीने करावे व केंद्र सरकारकडे पाठवावेत, असे आवाहन सभापती लांडे यांनी केले आहे. मागासवर्गीय शेतकऱ्यांना विशेष घटक योजनेतून विहिरीसाठी मिळालेल्या ९ कोटी ३१ लाख रुपये खर्चाचे नियोजन करण्याच्या सूचना सभापतींनी दिल्या. परंतु विहिरीसाठी अवघे एक लाखाचे अनुदान मिळत असून ते तीन लाखांचे करण्याचा ठराव मंजूर करण्यात आला.
---------------------------
सामूहिक शेततळ्याचे निकष बदला
सामूहिक शेततळ्यासाठी किमान २० हेक्टर फळबाग, (१०० बाय १०० बाय ३ मीटर) असलेल्या शेतकऱ्यांना २० लाखांचे अनुदान देण्याचा शासनाचा आदेश आहे. किमान ५ हेक्टरपासून व लहान साईजचे शेततळे शिवाय अन्य पिकांसाठीही शेततळे मंजूर करावे, असा ठराव कृषी समितीच्या बैठकीत झाला.
---------------------------
औषध खरेदी व दुरुस्ती कामात पारदर्शकता
पशुसंवर्धन समितीच्या बैठकीत जनावरांसाठी खरेदी करण्यात येणाऱ्या औषध खरेदीची ठेकेदाराकडून वेळेत देण्यासाठी बाँडवर हमी घेण्यात येणार आहे. वेळेत औषधे पुरवली नाहीत तर दंड केला जाणार आहे. दवाखाने दुरुस्तीच्या कामासाठीच्या प्रस्तावावरही पाहणी करुन गरज असेल तरच मंजुरी देण्यात येणार आहे. उगीच अनुदान खर्ची टाकण्यासाठी दुरुस्तीच्या कामांना मंजुरी दिली जाणार नाही, असे सभापती जालिंधर लांडे यांनी सांगितले.
------------------------
नोकरदारांना सेवानिवृत्त होईपर्यंत पगार असतो व सेवानिवृत्त झाल्यानंतर पेन्शन मिळते. त्यामुळे किमान पती-पत्नी दोघांच्या उपजीविकेची अडचण राहत नाही. परंतु शेतकऱ्यांची अवस्था फारच कठीण आहे. अगोदरच शेतकरी कुटुंब अडचणीत अन् वृद्ध शेतकऱ्यांची फारच अवघड. त्यामुळे पेन्शन सुरू करावी.
- जालिंधर लांडे
जि. प. कृषी समिती सभापती

Web Title: Resolution of giving pension to old farmers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.