शहरं
Join us  
Trending Stories
1
भेटायला गेले अन् पक्षप्रवेश करून घेतला; सकाळी शिंदे गटात, संध्याकाळी ठाकरे गटात
2
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
3
अमित शाहांच्या मॉर्फ्ड व्हिडीओ प्रकरणी X कडून मोठी कारवाई, झारखंड काँग्रेसचं अकाऊंट केलं बंद
4
आजचे राशीभविष्य - २ मे २०२४; व्यापारासाठी दिवस उत्तम, आर्थिक बाबी मार्गी लागतील
5
कूलर, पंखा, एसीमुळे किती वाढते विजेचे बिल?
6
स्ट्रोकनंतर पहिल्यांदाच समोर आले Zerodha चे फाऊंडर Nithin Kamath; हेल्थ बद्दल दिली 'ही' माहिती
7
२८-१५-५ महायुतीचा फॉर्म्युला; नाशिक, ठाणे शिंदेसेनेला, पालघर भाजपकडे
8
किंमत वाढूनही आपण खरेदी केले टनाने सोने; भारतीयांनी तीन महिन्यांत घेतले १३६.६ टन सोने
9
जीएसटीने भरली सरकारची तिजोरी; एप्रिलमध्ये २.१० लाख कोटींची वाढ
10
अमेरिकेपेक्षा भारतातच ‘एआय’चा वापर अधिक; तंत्रज्ञान स्वीकारण्यात देश सर्वात आघाडीवर
11
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदानाची अंतिम टक्केवारी जाहीर; ३ टक्क्यांची वाढ
12
राज ठाकरे सभा घेऊन कोणाच्या वरातीत नाचणार? सभेसाठी मनसेच्या अर्जावर उद्धवसेनेची टीका
13
भाजप-उद्धवसेना फक्त एका ठिकाणी समोरासमोर; गळ्यात गळे घालून फिरणारे शिवसैनिक एकमेकांच्या विरोधात
14
मुंबईत षटकार मारणार, राज्यात १५ जागा जिंकणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विश्वास
15
लॉकअपमधल्या चादरीच्या पट्टीने गळफास घेत बिश्नोई गँगच्या आरोपीची आत्महत्या
16
देशाच्या विकासात काँग्रेस अडथळा; ‘फॅमिली फर्स्ट’मुळे भारताचे नुकसान, योगी आदित्यनाथ यांचे टीकास्त्र
17
ठाण्यात दोघा माजी महापौरांमध्ये पुन्हा लढत; २०१४ मध्ये राजन विचारे विरुद्ध संजीव नाईक झाली होती लढत
18
प्रज्वल रेवण्णा उद्या बंगळुरूत येणार; आरोप तथ्यहीन असल्याचा दावा
19
पंतप्रधानांच्या पत्रात दडला निवडणुकीचा अजेंडा; उमेदवारांच्या माध्यमातून मतदारांना संदेश
20
श्रीकांत यांच्या कल्याणसाठी म्हस्केंना उमेदवारी देऊन विचारेंना बाय ? राजन विचारे यांना निवडणूक सोपी जाणार अशी चर्चा सुरू

नव्या वैद्यकीय कायद्यातील बदलांना विरोध करीत सोलापूरातील २ हजार डॉक्टर संपावर, अत्यावश्यक सेवेवर परिणाम नाही !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 02, 2018 12:44 PM

केंद्र सरकारच्या नॅशनल मेडिकल कमिशन बिलातील जाचक बदलांच्या निषेधार्थ देशभरातील वैद्यकीय व्यावसायिकांनी सकाळी सहा ते सायंकाळी सहा असा बारा तासांचा बंद पाळला आहे़

ठळक मुद्देलोकसभेत सादर झालेले बिल रुग्ण वैैद्यकीय क्षेत्रातील विद्यार्थी आणि डॉक्टरांनाही नुकसानीचे सकाळी ६ ते सायंकाळी ६ पर्यंत १२ तास बाह्यरुग्ण विभाग बंद राहणारआंतररुग्ण आणि तातडीची सेवा सुरुच राहणार

आॅनलाइन लोकमत सोलापूरसोलापूर दि २ : केंद्र सरकारच्या नॅशनल मेडिकल कमिशन बिलातील जाचक बदलांच्या निषेधार्थ देशभरातील वैद्यकीय व्यावसायिकांनी सकाळी सहा ते सायंकाळी सहा असा बारा तासांचा बंद पाळला आहे़ या संपात सोलापूरातील २ हजार डॉक्टरांचा सहभाग असल्याचे सांगण्यात आले़  मात्र अत्यावश्यक रुग्णसेवा सुरु असल्याने कोणत्याही प्रकारच्या अडचणी रूग्णांना होत नसल्याचेही दिसत आहे़ केंद्र सरकारच्या वतीने नॅशनल मेडिकल कमिशन बिलांतर्गत मोठे फेरबदल केले जाणार आहेत़ त्यात डॉक्टरांचे प्रतिनिधी घटवण्यात येणार असून, शासन नियुक्त प्रतिनिधी वाढवण्यात येणार आहेत़ त्यामुळे सरकारच्या चुकीचे धोरण पुढे रेटण्याचा प्रयत्न केला जाण्याची शक्यता आहे़ वैैद्यकीय महाविद्यालयांना मान्यता देतानाही चुकीची धोरणे राबविली जाण्याची शक्यता आहे़ त्यासोबतच नीटसारख्या सामाईक परीक्षातही मोठे फेरबदल होण्याची शक्यता आहे़ याचा त्रास वैद्यकीय व्यावसायिकांसह विद्यार्थ्यांना होणार आहे़ केंद्राचे हे नवे विधेयक २ जानेवारी रोजी संसदेत मांडले जाणार आहे़ या लोकशाही विरोधी विधेयकाला विरोध करण्यासाठी आयएमएने हा एक दिवसाचा बंद पुकारला आहे़ यादरम्यान निवेदन देऊन आंदोलन केले जाणार आहे़ आंदोलनादरम्यान बाह्यरुग्ण विभाग बंद राहणार आहे़ शस्त्रक्रियाही केल्या जाणार नाहीत़ अत्यावश्यक शस्त्रक्रिया मात्र केल्या जातील अशी माहिती आयएमएच्या शाखेने दिली़ ------------------दोन हजार डॉक्टरांचा सहभाग...- सोलापूर शहरातील ७५० डॉक्टर आयएमएचे सदस्य आहेत़ ग्रामीण भागातील अकलूज, बार्शी, पंढरपूर, अक्कलकोट, कुर्डूवाडी येथील बहुतांश रुग्णालये बाह्यरुग्ण सेवा बंद ठेवून तेथील डॉक्टर संपात सहभागी होत आहेत़ जवळपास दोन हजार डॉक्टरांचा यात समावेश असणार आहे़--------------लोकसभेत सादर झालेले बिल रुग्ण वैैद्यकीय क्षेत्रातील विद्यार्थी आणि डॉक्टरांनाही नुकसानीचे आहे़ त्याला विरोध करण्यासाठी मंगळवारी सकाळी ६ ते सायंकाळी ६ पर्यंत १२ तास बाह्यरुग्ण विभाग बंद राहणार आहे़ आंतररुग्ण आणि तातडीची सेवा सुरुच राहणार आहे़- डॉ़ ज्योती चिडगुपकरचेअरमन, आयएमए सोलापूर 

टॅग्स :Solapurसोलापूरdoctorडॉक्टर