आरक्षण हे आर्थिक निकषावर द्यावे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 06:46 IST2021-02-05T06:46:37+5:302021-02-05T06:46:37+5:30
ब्राह्मण महासंघाच्या बार्शी शाखेचा व राज्यव्यापी ब्राह्मण महासंपर्क अभियानाच्या प्रारंभप्रसंगी ते बोलत होते. यावेळी बार्शी शाखेचे कार्यालय व ...

आरक्षण हे आर्थिक निकषावर द्यावे
ब्राह्मण महासंघाच्या बार्शी शाखेचा व राज्यव्यापी ब्राह्मण महासंपर्क अभियानाच्या प्रारंभप्रसंगी ते बोलत होते. यावेळी बार्शी शाखेचे कार्यालय व हिंदुत्व मासिकाचे अनावरणही करण्यात आले. तसेच बार्शी तालुका व जिल्हास्तरावरील तसेच प्रदेश कार्यकारिणीवरील पदाधिकाऱ्यांची निवड जाहीर केली.
यावेळी ब्राह्मण महासंघाचे विश्वस्त ॲड. विश्वास देशपांडे, श्रीपाद कुलकर्णी, मनोज तारे, प्रदेश संपर्कप्रमुख उमेश काशीकर, प्रदेश महिला आघाडी उपाध्यक्ष नमिता थिटे, पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष पद्मजा टोळे यांच्यासह सोलापूर, उस्मानाबाद व पुणे जिल्ह्यातील पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी बार्शीतून प्रदेश कार्यकारिणीवर प्रवीण शिरसीकर, ॲड. विजय कुलकर्णी व मीना धर्माधिकारी यांची निवड केली. शीतल कुलकर्णी यांनी सूत्रसंचालन केले. महाराष्ट्र प्रदेश संघटक प्रवीण शिरसीकर यांनी प्रास्ताविक, तर शहराध्यक्ष प्रसाद सहस्त्रबुद्धे यांनी आभार मानले.
फोटो
०३बार्शी
ओळी
बार्शी येथे मासिकाच्या अनावरणप्रसंगी आनंद दवे, ॲड. विश्वास देशपांडे, श्रीपाद कुलकर्णी, उमेश काशीकर आदी.