१२९ ग्रामपंचायतींच्या सरपंचपदाचे आरक्षण निश्चित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 9, 2020 04:17 IST2020-12-09T04:17:38+5:302020-12-09T04:17:38+5:30
१२९ ग्रामपंचायतींपैकी पाच ग्रामपंचायतींवर अनुसूचित जातीतील महिला, तर सहा पुरुषांना संधी मिळणार आहे. तसेच अनुसूचित जमातीतील एका महिलेस संधी ...

१२९ ग्रामपंचायतींच्या सरपंचपदाचे आरक्षण निश्चित
१२९ ग्रामपंचायतींपैकी पाच ग्रामपंचायतींवर अनुसूचित जातीतील महिला, तर सहा पुरुषांना संधी मिळणार आहे. तसेच अनुसूचित जमातीतील एका महिलेस संधी मिळणार आहे. ३५ ग्रामपंचायतींवर १८ महिला व १७ पुरुषांना सरपंचपदाची संधी मिळणार आहे. ८२ ग्रामपंचायतींपैकी सर्वसाधारण गटातील ४१ ठिकाणी महिला, तर ४१ पुरुषांना संधी मिळेल.
दरम्यान, तहसीलस्तरावरून गावनिहाय आरक्षण काढले जाणार आहे. आरक्षण काढताना सर्वच चिठ्ठ्या समान आकाराच्या असाव्यात, दि. १६ डिसेंबरला ११ वाजता तालुक्याच्या मुख्यालयाच्या ठिकाणी सोडत काढावी, अशा सूचना जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी केल्या आहेत. आरक्षण सोडतवेळी आमदार, पंचायत समितीचे सभापती, जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्यांना निमंत्रित करावे. तसेच सर्व ग्रामपंचायतींचे सरपंच व सदस्यांनाही निमंत्रित करावे, असे जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे. बार्शी तालुक्यात एकशेतीस ग्रामपंचायती असल्या तरी या टप्प्यामध्ये ९६ ग्रामपंचायतींच्या पंचवार्षिक निवडणुका होणार आहेत.
----