शहरं
Join us  
Trending Stories
1
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
2
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
3
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
4
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
5
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
6
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
7
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
8
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
9
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
10
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
11
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
12
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
13
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
14
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
15
चोरट्यांनी शोधला बँक खाती रिकामी करण्याचा नवा मार्ग; काय आहे 'व्हॉट्सअ‍ॅप स्क्रीन मिररिंग फ्रॉड'?
16
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
17
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर
18
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
19
घरावर गोळीबार झालेल्या प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादवची संपत्ती किती? कमाईचं मुख्य साधन कोणतं?
20
२ राजयोगात शेवटचा श्रावण सोमवार: ‘ही’ शिवामूठ अर्पण करा; शिवकृपेची सुवर्ण संधी चुकवू नका!

सोलापूरकरांना त्रासदायक ठरणाऱ्या अतिसूक्ष्म धुलीकणावर संशोधन करणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 31, 2020 16:45 IST

शहरात दोन ठिकाणी प्रदूषण मापक यंत्रणा : एमपीसीबी, ऑर्किड कॉलजेचा पुढाकार

सोलापूर : शहरात वाढणाऱ्या धुळीमुळे अनेक सोलापूरकरांना श्वसन व फुफ्फुसाचा त्रास होतो. हवेतील सूक्ष्म धुलिकण (पार्टिक्युलेट मॅटर १०), अतिसूक्ष्म धुलिकण (पीएम २.५), कार्बन डायऑक्साइड, नायट्रोजन अशा घातक वायूंची मोजणी करण्यात येणार आहे. यासाठी शहरात दोन ठिकाणी प्रदूषण मापक यंत्र बसविण्यात येणार असल्याची माहिती प्रदूषण नियंत्रण मंडळाचे उपप्रादेशिक अधिकारी प्रशांत भोसले यांनी लोकमत शी बोलताना दिली.

सध्या वालचंद अभियांत्रिकी महाविद्यालय(अक्कलकोटरोड, एमआयडीसी) व वोरोनोको प्रशाला ( रंगभवन) येथे दोन यंत्र सुरू आहेत. यात आता वाढ होणार असून, देगावरोड व रूपा भवानी मंदिर परिसर या ठिकाणी आणखी दोन प्रदूषण मापक यंत्रणा कार्यान्वित होणार आहेत. नव्या यंत्राचे वैशिष्ट म्हणजे यात अतिसूक्ष्म धुलीकणाचे (पीएम २.५) प्रमाण तपासणे शक्य आहे. सोलापूर शहरासोबतच बार्शी शहरात तीन ठिकाणी, तर पंढरपूर शहरात एका ठिकाणी प्रदूषण मापक यंत्रणा कार्यान्वित होणार आहे. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ व ऑर्किड अभियांत्रिकी महाविद्यालय यांच्या सहकार्याने धुलीकरणावर संशोधन होईल.

नवीन जिल्हाधिकारी कार्यालयात सीएएमक्यूएमएस

सात रस्ता येथे असणाऱ्या नवीन जिल्हाधिकारी कार्यालयात कंटिन्यूअस एंबिएंट एयर क्वालिटी मॉनिटरिंग सिस्टम (सीएएमक्यूएमएस) बसविण्यात येणार आहे. या नव्या तंत्राच्या माध्यमातून पीएम २.५, पीएम १०, सल्फर डायऑक्साइड, ऑक्साइड ऑफ नाइट्रोजन, कार्बन मोनोक्साइड, ओजोन, अमोनियासहित इतर वायूंच्या प्रमाणाची माहिती मिळणार आहे. प्रत्येक मिनिटांची स्थिती तेथील डिसप्लेवर पाहता येईल.

--------------

शहरात नव्याने मॅन्युअलपद्धतीचे दोन प्रदूषण मापक यंत्र बसविण्यात बसविण्यात येणार आहे. याची प्रक्रियादेखील पूर्ण झाली आहे. यासोबतच नवीन जिल्हाधिकारी कार्यालयात सीएएमक्यूएमएस यंत्रणा बसविण्याचे नियोजन करण्यात आले आहे.

- प्रशांत भोसले, उपप्रादेशिक अधिकारी, प्रदूषण नियंत्रण मंडळ, सोलापूर

------------------

शहराचे हवेची गुणवत्ता तपासण्यासाठी या नव्या यंत्रणेचा उपयोग होईल. महाविद्यालयातील प्रयोगशाळेत पुढील तपासणी व अ‍ॅनालिसीस करणार आहोत. तसेच एखाद्या विशिष्ट ऋतूत किती प्रदूषण असते हेही तपासले जाईल.

- डॉ. विनायक पत्की, विभागप्रमुख, ऑर्किड अभियांत्रिकी महाविद्यालय

टॅग्स :Solapurसोलापूरpollutionप्रदूषणinterviewमुलाखत