शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
5
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
6
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
7
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
8
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
9
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
10
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
11
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
12
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
13
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
14
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
15
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
16
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
17
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
18
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
19
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

सोलापूर महापालिकेत रिपब्लिकन सेनेच्या कार्यकर्त्याचा आत्मदहनाचा प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 3, 2018 13:35 IST

अनर्थ टळला : पोलिसांनी धावाधाव करुन ताब्यात घेतले

ठळक मुद्दे महापालिका आयुक्त कार्यालयाने या निवेदनाची दखल घेतली नाहीप्राथमिक शिक्षण मंडळ कार्यालयातील अनागोंदी कारभाराबाबत गायकवाड यांनी तक्रार केली केली

सोलापूर :  महापालिका प्राथमिक शिक्षण मंडळाच्या प्रशासन अधिकारी सुधा साळुंके यांच्यावर कारवाई करण्यात यावी या मागणीसाठी एकाने शनिवारी दुपारी बारा वाजण्याच्या सुमाराला महापालिकेतील आयुक्त कार्यालयासमोर अंगावर डिझेल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न केला. याठिकाणी बंदोबस्तास असलेल्या पोलिसांनी त्याला पकडून उपचारासाठी शासकीय रुग्णालयात हलविले आहे. 

  विनायक गायकवाड (रा. शहा हौसिंग सोसायटी) असे या तरुणाचे नाव आहे. ते रिपब्लिकन सेनेचे जिल्हा सचिव आहेत. महापालिका प्राथमिक शिक्षण मंडळ कार्यालयातील अनागोंदी कारभाराबाबत गायकवाड यांनी तक्रार केली केली होती. याला भीम आर्मी संघटनेने पाठींबा दिला होता.  त्यावर उप आयुक्त त्रिंबक ढेंगळे-पाटील यांच्याकडून या प्रकरणाची चौकशी होऊन फाईल आयुक्तांकडे गेली होती.

 गायकवाड यांनी केलेल्या तक्रारीत तथ्य आढळून आल्याने साळुंके यांच्यावर कारवाईची आयुक्तांनी शिक्षण उपसंचालकांकडे शिफारस करावी, असे गायकवाड यांचे म्हणणे आहे. वारंवार पाठपुरावा करूनही ही फाईल हलली नाही. त्यामुळे गायकवाड यांनी ८ आॅक्टोबर रोजी आयुक्तांना दिलेल्या निवेदनात ३ नोव्हेंबर रोजी आत्मदहन करण्याचा इशारा दिला होता. तरीही महापालिका आयुक्त कार्यालयाने या निवेदनाची दखल घेतली नाही. 

टॅग्स :SolapurसोलापूरSolapur Municipalसोलापूर महानगरपालिकाSolapur City Policeसोलापूर शहर पोलीसCrime Newsगुन्हेगारी