शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
4
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
5
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
6
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
7
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
8
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
9
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
10
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
11
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
12
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
13
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
14
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
15
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
16
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
17
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
18
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
19
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
20
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
Daily Top 2Weekly Top 5

दोन दिवसाला घडामोडी कळवा; पवारांनी दिले सोलापुरातील नेत्यांना आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2019 14:09 IST

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी माढ्यासह सोलापूर लोकसभा मतदारसंघातील हालचालींवर लक्ष ठेवले आहे.

ठळक मुद्देशहरातील विविध क्षेत्रात काम करणारी मंडळी पवारांना भेटायला आली होती. या मंडळींकडून पवारांनी शहराचा कौलही जाणून घेतला. राष्ट्रवादीच्या प्रमुख पदाधिकाºयांनी सोलापुरात घडणाºया घडामोडींचा अहवाल माझ्यापर्यंत येईल, अशी व्यवस्था करावी, असेही पवारांनी सांगितल्याचे सांगण्यात आले. 

सोलापूर : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी माढ्यासह सोलापूर लोकसभा मतदारसंघातील हालचालींवर लक्ष ठेवले आहे. सोलापूर मतदारसंघात घडणाºया घडामोडींचा अहवाल दर दोन दिवसाला पाठवा, असे आदेशही त्यांनी राष्ट्रवादीतील प्रमुख नेत्यांना दिले आहेत. 

शरद पवार यांनी बुधवारी शहरात दोन सभा घेतल्या. यंत्रमाग धारकांसोबत बैठक घेतली. राष्ट्रवादी भवनात घेतलेल्या बैठकीत त्यांनी माढा मतदारसंघात येणाºया तालुक्यातील नेत्यांच्या बैठका घेतल्या. त्यांच्याकडून परिस्थितीचा आढावा घेतला. पवारांनी कालच्या पत्रकार  परिषदेत धनगर आरक्षण, मुस्लीम व मागासवर्गीय समाजावर  होणारे अत्याचार याबाबत भाष्य केले होते. 

माढा मतदारसंघातील प्रचारात राष्ट्रवादीचे नेते या मुद्यांवर चर्चा घडवून आणणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. पवारांनी सायंकाळी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांच्या निवासस्थानी भेट दिली.  यावेळी दोन्ही नेत्यांनी रणनितीवर चर्चा केल्याचे समजते.

शहरातील लोकांकडून जाणून घेतला कौल- पवार बुधवारी रात्री सोलापूर मुक्कामी होते. गुरुवारी सकाळी त्यांनी परत जाताना राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष भारत जाधव, कार्याध्यक्ष संतोष पवार यांच्याशी चर्चा केली. निवडणुकीतील व्यूहरचनेबाबत काही शंका असतील तर त्या आताच सांगा, असे सांगून शहराच्या विविध भागातून होणारे मतदान आणि शहरवासीयांची भूमिका याबद्दलही माहिती घेतली. शहरातील विविध क्षेत्रात काम करणारी मंडळी पवारांना भेटायला आली होती. या मंडळींकडून पवारांनी शहराचा कौलही जाणून घेतला. राष्ट्रवादीच्या प्रमुख पदाधिकाºयांनी सोलापुरात घडणाºया घडामोडींचा अहवाल माझ्यापर्यंत येईल, अशी व्यवस्था करावी, असेही पवारांनी सांगितल्याचे सांगण्यात आले. 

टॅग्स :SolapurसोलापूरLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकsolapur-pcसोलापूरmadha-pcमाढाElectionनिवडणूक