माझी बदली करा; जिल्हा आरोग्य अधिकाºयांची प्रधान सचिवांकडे विनंती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 4, 2020 11:03 AM2020-06-04T11:03:50+5:302020-06-04T11:08:35+5:30

प्रकृती अस्वास्थ व कौटुुंबिक समस्याचे दिले कारण; सोलापूर जिल्हा परिषदेत उलट सुलट चर्चा

Replace me; Request of the District Health Officer to the Principal Secretary | माझी बदली करा; जिल्हा आरोग्य अधिकाºयांची प्रधान सचिवांकडे विनंती

माझी बदली करा; जिल्हा आरोग्य अधिकाºयांची प्रधान सचिवांकडे विनंती

googlenewsNext
ठळक मुद्दे- सोलापूर जिल्ह्यातही कोरोनाचे रूग्ण वाढले- जिल्हा आरोग्य यंत्रणा झाली सतर्क- सोलापूर जिल्हा परिषदेमधील आरोग्य विभागातील ताण वाढला

सोलापूर : सोलापूर जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. भीमाशंकर जमादार यांनी प्रकृती अस्वास्थामुळे आरोग्य विभागाच्या प्रधान सचिवाकडे विनंती बदलीची मागणी केली आहे. 

जिल्ह्यात कोरोना संसर्गाचे रुग्ण वाढू लागल्याने जिल्हा आरोग्य विभागातील ताण वाढला आहे. अशात प्रकृती अस्वास्थ व कौटुुंबिक समस्यामुळे बदली करण्यात यावी असा अर्ज डॉ. जमादार यांनी मंगळवारी दिला आहे. मलेरियाचे सहायक संचालक, कुटुंब कल्याण संस्थेचे प्राचार्य किंवा लातूरच्या मलेरिया विभागाच्या सहायक संचालकावर नियुक्ती मिळावी अशी त्यांनी मागणी केली आहे. 

डॉ. जमादार यांच्या या पत्रामुळे जिल्हा परिषदेत उलट सुलट चर्चा सुरू झाली आहे. एकीकडे सध्या आरोग्य साहित्य खरेदीवरून हा विभाग सदस्यांच्या रडारवर आहे. दुसरीकडे ते जूनअखेर निवृत्त होत आहेत असे सांगण्यात येत होते. अशात त्यांनी विनंती अर्जात बदलीचे ठिकाण स्पष्ट केल्यामुळे अर्जाचे गौंडबंगाल या काय असा सवाल उपस्थित केला जात आहे. विशेष म्हणजे प्रमुख पदावर असणाºया डॉक्टरांना मुदतवाढ देण्यास न्यायालयाने नकार दिला आहे.


 

Web Title: Replace me; Request of the District Health Officer to the Principal Secretary

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.