८१ लाखांचा खर्च करून केला दर्लिंग देवस्थानाचा जीर्णोद्धार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2021 04:48 IST2021-09-02T04:48:19+5:302021-09-02T04:48:19+5:30

चळे येथील जागृती देवस्थान दर्लिंग देवाच्या दर्शनासाठी सोलापूर जिल्ह्यासह पुणे, कोल्हापूर, बीड, गोवा, उस्मानाबाद आदी जिल्ह्यातील भाविक भक्त येतात. ...

Renovation of Darling Devasthan done at a cost of Rs. 81 lakhs | ८१ लाखांचा खर्च करून केला दर्लिंग देवस्थानाचा जीर्णोद्धार

८१ लाखांचा खर्च करून केला दर्लिंग देवस्थानाचा जीर्णोद्धार

चळे येथील जागृती देवस्थान दर्लिंग देवाच्या दर्शनासाठी सोलापूर जिल्ह्यासह पुणे, कोल्हापूर, बीड, गोवा, उस्मानाबाद आदी जिल्ह्यातील भाविक भक्त येतात. मंदिराचे बांधकाम जुन्या काळातील असल्याने प्रत्येक रविवार व चैत्र पौर्णिमेला येथे भाविकांची दर्शनासाठी गर्दी असते. दर्लिंग अन्नछत्र मंडळाने १०० टक्के लोकवर्गणीतून आतापर्यंत ८१ लाख २६ हजार रुपये दर्लिंग मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी खर्च केले आहेत.

यामध्ये मंदिरामधील सभामंडपासाठी ३५ लाख, शिखर बांधकामासाठी ७ लाख, नक्षीकाम व मुख्य मंदिरातील गाभाऱ्यासाठी १३ लाख रुपये खर्च झाले आहेत. आमदार यशवंत माने यांच्या फंडातून सभामंडपासाठी १० लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. तर दर्लिंग वालगी मंडळातून २ लाखांची देणगी दिली आहे.

यासाठी अन्नछत्र मंडळाचे अध्यक्ष रामचंद्र मोरे, सचिव रतिलाल गायकवाड, विठ्ठल मोरे, पितांबर जाधव, हरी वाघ, आनंदा सरीक, अण्णा शिखरे, महादेव पवार, मारुती वाघ, सुखदेव मोरे, औदुंबर गायकवाड, अंकुश पंडित, दत्ता गुरव, बाळू गायकवाड, विष्णू माने, बाळू माने हे परिश्रम घेत आहेत.

Web Title: Renovation of Darling Devasthan done at a cost of Rs. 81 lakhs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.