उजनी धरणातून कालव्याद्वारे पुन्हा पाणी सोडले
By Admin | Updated: April 11, 2017 17:17 IST2017-04-11T17:17:51+5:302017-04-11T17:17:51+5:30
.

उजनी धरणातून कालव्याद्वारे पुन्हा पाणी सोडले
आॅनलाइन लोकमत सोलापूर
सोलापूर दि ११ : उजनी धरणातून मंगळवारी पुन्हा कालव्याद्वारे पाणी सोडण्यात आले आहे़ कालव्यातून पाणीपुरवठा बंद करून केवळ आठवडा उलटण्याच्या आत पुन्हा २२०० क्युसेक्स पाणी सोडण्यात आल्याने शेतकऱ्यांमधून आश्चर्य व्यक्त होत आहे़ मात्र याबाबत संबंधित अधिकाऱ्यांकडून योग्य उत्तर मिळत नसल्याने गोंधळात भर पडली आहे़ २० फेब्रुवारी ते ५ एप्रिल असे कालव्याद्वारे पाणी वाटप सुरू होते़ धरणातून भीमा-सीना कालवा आणि बोगदा याद्वारे ४५ दिवस पाणीपुरवठा करण्यात आला़ यामुळे धरणातील ४५ टक्के पाणी घटले़ धरणात केवळ १५ टक्के पाणीसाठा असताना मंगळवारी अचानक पुन्हा पाणी सोडण्यात आल्याचे वृत्त वाऱ्यासारखे पसरल्याने शेतकऱ्यांमधून आश्चर्य व्यक्त होत आहे़ धरणातील पाण्याच्या वाटपाबाबत कोणताही निश्चित कार्यक्रम प्रशासनाकडे दिसत नाही, त्यातच धरणातील गाळ काढण्यासाठी पाणी संपविले जात असल्याची जोरदार चर्चा शेतकऱ्यांमध्ये होत आहे़