अवघ्या ४० तासांत अल्पवयीन मुलीची सुटका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2021 04:26 IST2021-08-22T04:26:19+5:302021-08-22T04:26:19+5:30
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, समर्थ राजू कांबळे (रा. आढीव, ता. पंढरपूर) याने अल्पवयीन मुलीस लग्नाचे आमिष दाखवून १७ ऑगस्ट रोजी ...

अवघ्या ४० तासांत अल्पवयीन मुलीची सुटका
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, समर्थ राजू कांबळे (रा. आढीव, ता. पंढरपूर) याने अल्पवयीन मुलीस लग्नाचे आमिष दाखवून १७ ऑगस्ट रोजी पळवून नेले होते. याबाबत तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला होता. त्यानंतर पोलीस हवालदार नितीन चवरे व पोलीस कॉन्स्टेबल बालाजी कदम यांनी तपासाची चक्रे फिरवली.
यानंतर समर्थ राजू कांबळे हा जत, जि. सांगली येथे असल्याबाबत पोलिसांना माहिती मिळाली. त्यामुळे पोलीस हवालदार नितीन चवरे व पोलीस कॉन्स्टेबल बालाजी कदम यांनी तात्काळ जत, जि. सांगली येथे जाऊन खात्री केली असता आरोपीने पीडित अल्पवयीन मुलीस घेऊन कराडकडे पोबारा केल्याचे समजले. तरीदेखील चवरे व कदम यांनी तांत्रिक विश्लेषण व गोपनीय बातमीच्या आधारे कराड (जि. सातारा) येथे जाऊन केवळ ४० तासांत आरोपीच्या मुसक्या आवळल्या व पीडितेची सुटका केली. पीडितेस कायदेशीररीत्या तिच्या आईच्या ताब्यात देण्यात आले आहे. या गुन्ह्याची गंभीरता पाहून व तपासाअंती गुन्ह्यामध्ये कलम वाढ करण्यात आली आहे.