शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
3
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
4
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
5
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
6
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
7
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
8
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
9
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
10
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
11
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!

रणरणत्या उन्हात दिलासा; ‘ठंडा ठंडा कुल कुल’ रिक्षाला सुगंध वाळ्याचा 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2019 14:51 IST

कडक उन्हात थंडगार कुलरच्या हवेची अनुभूती देत प्रवास ‘ठंडा ठंडा कुल कुल’ अशीच सफर सध्या सोलापुरकरांना अनुभवायला मिळत आहे़

ठळक मुद्देरिक्षाच्या उजव्या बाजूला वाळ्याचे पडदे बांधले असून त्यावर वारंवार पाणी शिंपडले जातेरिक्षा वेगाने पुढे चालली की थंडगार हवा प्रवाशांना मिळतेकडक उन्हात थंडगार कुलरच्या हवेची अनुभूती देत प्रवास ‘ठंडा ठंडा कुल कुल’ अशीच सफर

यशवंत सादूल

सोलापूर : कडक उन्हात थंडगार कुलरच्या हवेची अनुभूती देत प्रवास ‘ठंडा ठंडा कुल कुल’ अशीच सफर अनुभवायला मिळते ते सुरेश कोरहळ्ळी यांच्या रिक्षात बसल्यावर. रिक्षाच्या उजव्या बाजूला वाळ्याचे पडदे बांधले असून त्यावर वारंवार पाणी शिंपडले जाते. रिक्षा वेगाने पुढे चालली की थंडगार हवा प्रवाशांना मिळते. वातानुकूलित प्रवासाचा अनुभव मिळतो.

पूर्वाश्रमीचे भाजी विक्रेते असलेले सुरेश कोरहळ्ळी यांनी १९८७ पासून रिक्षा चालविण्याचा व्यवसाय पत्करला. सुरुवातीला हरिभाई, सिद्धेश्वर प्रशालेच्या विद्यार्थ्यांना वाहतूक सेवा देत असत, पुढे वालचंद कॉलेजच्या विद्यार्थ्यांसाठी सेवा सुरू केली.

इतर वेळेत मात्र ते सर्वसामान्य प्रवाशांकरिता वाहतूक सेवा देतात. सुरेश कोरहळ्ळी यांना दोन मुले असून एक कॉम्प्युटर आॅपरेटर आहे तर दुसरा मुलगा हॉटेल व्यवसायात आहे तर मुलगी कॉम्प्युटर डिप्लोमाधारक आहे. प्रवाशांसोबत सगळ्यांच्या सोयीसाठी रिक्षात फिरत्या पाणपोईची व्यवस्था करण्यात आली आहे. प्रवाशांना थंडगार पाणी तर मिळतेच ज्या ठिकाणी रिक्षा थांबून राहते तेथील तहानलेल्या सर्वांनाही पाणी दिले जाते. वरदी व्यतिरिक्त वालचंद कॉलेज व जिल्हा परिषद या ठिकाणी कायम ही रिक्षा आपली सेवा देण्यासाठी उभी असते. 

दररोज २५ ते ३० विद्यार्थी व ३५ ते ४० प्रवाशांची ने आण करण्यासोबत अंध,अपंग, गरोदर,निराधार महिलांना मोफत सेवा देतात.  रिक्षाच्या पाठीमागील बाजूस पाण्याची टाकी ठेवली असून ज्या ठिकाणी प्रवाशांना सोडतो त्या ठिकाणी लगेच वाळ्याच्या पडद्यावर पाणी मारले जाते,पुढचा प्रवास सुरु होतो, सकाळी ७ ते रात्री उशिरापर्यंत प्रवाशांच्या मागणीप्रमाणे सेवा देतात. रिक्षाचालकाच्या या उपक्रमाचे प्रवाशांमधून जोरदार स्वागत होत आहे.  इतर रिक्षाचालकांनीही उन्हाळा संपेपर्यंत ही पद्धत सुरु करावी, असा सूर ऐकावयास मिळत आहे.

मतदान जनजागृतीसाठी...- जसा उन्हाचा कडाका वाढला तसा गेल्या महिना दीड महिन्यापासून ठंडा कुल प्रवासाची सोय केलेल्या सुरेश कोरहळ्ळी  यांनी रिक्षाच्या दोन्ही बाजूस लोकसभेच्या पार्श्वभूमीवर लोकशाहीसाठी मतदानाचा हक्क बजविण्याचे आवाहनही केले आहे. असह्य होणारे  उन्हाचे चटके आणि गरम हवा प्रवाशांना लागू नये आणि प्रवास सुखकारक व्हावा या उद्देशाने यंदा प्रथमच वाळ्यांचे पडदे रिक्षास बांधले आहेत. प्रवासी माझ्या रिक्षात बसण्यास पहिली पसंती दाखवितात. गेल्या महिनाभरापासून अनेक प्रवाशांसह पुण्याहून इंटरसिटीने येणारे प्रवासी मोबाईल नंबर घेऊन वर्दी देत असल्याचे रिक्षाचालका सुरेश कोरहळ्ळी यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. 

टॅग्स :SolapurसोलापूरTravel Tipsट्रॅव्हल टिप्सTemperatureतापमान