शहरं
Join us  
Trending Stories
1
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
2
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
3
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
4
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
5
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
6
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
7
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
8
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
9
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
10
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
11
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
12
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
13
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
14
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
15
चोरट्यांनी शोधला बँक खाती रिकामी करण्याचा नवा मार्ग; काय आहे 'व्हॉट्सअ‍ॅप स्क्रीन मिररिंग फ्रॉड'?
16
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
17
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर
18
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
19
घरावर गोळीबार झालेल्या प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादवची संपत्ती किती? कमाईचं मुख्य साधन कोणतं?
20
२ राजयोगात शेवटचा श्रावण सोमवार: ‘ही’ शिवामूठ अर्पण करा; शिवकृपेची सुवर्ण संधी चुकवू नका!

या कारणामुळे लोकसभेचा निकाल लागणार दोन तास उशीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 10, 2019 12:48 IST

सोलापूर जिल्ह्यातील सर्व घाऊक व किरकोळ मद्यविक्री आणि ताडी विक्री दुकाने बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत.

ठळक मुद्देरामवाडी येथील शासकीय गोदामात २३ मे रोजी सकाळी आठ वाजता मतमोजणीप्रत्येक विधानसभा मतदारसंघातील पाच मतदान केंद्रातील व्हीव्ही पॅटमधील पोहोच देणाºया पावत्यांची मोजणीही यावेळी करण्यात येणार

निर्णय अधिकारी : 

सोलापूर : न्यायालयाच्या आदेशानुसार प्रत्येक विधानसभा मतदारसंघातील पाच मतदान केंद्रातील व्हीव्हीपॅटमधील पोहोच पावत्यांची मतमोजणी करण्यात येणार आहे. मतमोजणीच्या दिवशी ही प्रक्रिया राबविण्यात येणार असल्याने मागील निवडणुकीपेक्षा या निवडणुकीचा निकाल जाहीर होण्यास किमान दोन तास लांबणीवर जाणार आहे. दुपारी चारपर्यंत मतमोजणीची प्रक्रिया सुरू राहील अशी माहिती माढा निवडणूक निर्णय अधिकारी रामचंद्र शिंदे यांनी दिली. 

२३ मे रोजी सकाळी आठ वाजता मतमोजणीची प्रक्रिया रामवाडी येथील शासकीय गोदामात होणार आहे. सकाळी सुरुवातीला पोस्टल मतांची मोजणी करण्यात येणार आहे. यासाठी पोस्टल मतपत्रिका मतदारांना पाठविण्यात येत आहेत. पोस्टाने हे मतदार मतपत्रिका पाठविणार आहेत. पोस्टल मतांची मोजणी झाल्यानंतर ईव्हीएम मशीनमधील मतांची मोजणी हाती घेण्यात येणार आहे. यासाठी १९ टेबल असणार आहेत. प्रत्येक विधानसभा मतदारसंघातील पाच मतदान केंद्रातील व्हीव्ही पॅटमधील पोहोच देणाºया पावत्यांची मोजणीही यावेळी करण्यात येणार आहे; मात्र पोहोच पावत्या या आकाराने लहान असल्याने मोजणीसाठी विलंब होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. 

ईव्हीएमवर घेण्यात येणाºया मतदानाबाबत न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार पोहोच देणाºया पावत्यांची मोजणी करण्यात येणार आहे. यासाठी निवडण्यात आलेल्या मतदान केंद्रातील व्हीव्ही पॅट मशीनचे सील मतमोजणी दिवशी तोडण्यात येणार आहे. 

मतदान व मोजणी दिवशी दारू दुकाने बंदचा आदेशमतदान व मतमोजणी प्रक्रिया शांततेत पार पडावी. या कालावधीत कोणताही कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न उद्भवू नये, यासाठी  जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी मतदान व मतमोजणीच्या कालावधीत सोलापूर जिल्ह्यातील सर्व घाऊक व किरकोळ मद्यविक्री आणि ताडी विक्री दुकाने बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत.

टॅग्स :Solapurसोलापूरmadha-pcमाढाsolapur-pcसोलापूरElection Commission of Indiaभारतीय निवडणूक आयोगSolapur Collector Officeसोलापूर जिल्हाधिकारी कार्यालय