आरसीसी गटार, रस्ते काँक्रिटीकरणास प्रारंभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 04:54 IST2021-01-13T04:54:38+5:302021-01-13T04:54:38+5:30
महाराष्ट्र सुवर्ण जयंती (शहरी) नगरोत्थान योजनेतील प्राप्त निधीतून प्रभाग क्र. ४ मध्ये पोपट रूपनर घर ते रियाज नदाफ ...

आरसीसी गटार, रस्ते काँक्रिटीकरणास प्रारंभ
महाराष्ट्र सुवर्ण जयंती (शहरी) नगरोत्थान योजनेतील प्राप्त निधीतून प्रभाग क्र. ४ मध्ये पोपट रूपनर घर ते रियाज नदाफ घर ते किरण सपाटे घरापर्यंत आरसीसी गटार व रस्ता काँक्रिटीकरणाचे काम हाती घेतले आहे. यासाठी नगरसेवक अस्मीर तांबोळी व नगरसेविका छाया मेटकरी यांनी पाठपुरावा केला होता.
यावेळी बांधकाम सभापती आप्सरा ठोकळे, नगरसेवक अस्मिर तांबोळी, माजी नगरसेवक माउली तेली, सोमनाथ ठोकळे, संजय लाळे, रियाज नदाफ, अनिल वाघमोडे, दत्ता तेली, ठेकेदार दिनेश येडगे यांच्यासह नागरिक, महिला उपस्थित होते.
फोटो ओळ :::::::::::::::::::::::
प्रभाग क्र. ४ मध्ये आरसीसी गटार व रस्ता काँक्रिटीकरण कामाचे भूमिपूजन करताना नगराध्यक्षा राणी माने नगरसेविका छाया मेटकरी, अप्सरा ठोकळे, अस्मीर तांबोळी, आदी.