निमगावच्या सरपंचपदी रवींद्र बारंगुळे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2021 04:24 IST2021-02-24T04:24:21+5:302021-02-24T04:24:21+5:30

तालुक्यातील निमगावच्या सरपंचपदी रवींद्र बारंगुळे यांची तर उपसरपंचपदी धर्मराज मुकणे यांची निवड झाली आहे. सरपंच पदाच्या निवडणुकीत राजेंद्र बारंगुळे ...

Ravindra Barangule as Sarpanch of Nimgaon | निमगावच्या सरपंचपदी रवींद्र बारंगुळे

निमगावच्या सरपंचपदी रवींद्र बारंगुळे

तालुक्यातील निमगावच्या सरपंचपदी रवींद्र बारंगुळे यांची तर उपसरपंचपदी धर्मराज मुकणे यांची निवड झाली आहे. सरपंच पदाच्या निवडणुकीत राजेंद्र बारंगुळे यांनी कल्पना जाधव यांचा एकमताने पराभव केला तर उपसरपंच पदाच्या निवडणुकीत धर्मराज मुकणे यांनी चित्रा पाटील यांचा ही एका मताने पराभव केला. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून एफ. बी. ढवळे यांनी काम पाहिले.

यावेळी ग्रामपंचायत सदस्या लोचना शिंदे, सौंविद्रा थोरात, कल्पना जाधव, पुण्यवती ओहोळ उपस्थित होत्या. विजया नंतर विठ्ठल मुकणे, जगन्नाथ मुकणे, महादेव मुकणे, संजय शिंदे, सुधीर पाटील, मारुती शिंदे, विलास मुकणे, रामदास शिंदे, बाळू जाधव, महादेव कांबळे, आनंद थोरात, संभाजी धोत्रे यांनी जल्लोष केला.

फोटो

२३निमगाव-राजेंद्र बारंगुळे

२३निमगाव-धर्मराज मुकणे

Web Title: Ravindra Barangule as Sarpanch of Nimgaon