शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरे सोबत आले, तर शिवसेना (UBT) इंडिया आघाडीतून बाहेर पडणार का? उद्धव ठाकरे म्हणाले...
2
'तुमच्याकडे पुरावे आहेत, न्यायालयात का जात नाही?', राहुल गांधींच्या आरोपांवर भाजपचा पलटवार
3
राहुल गांधींनी उल्लेख केलेला आदित्य श्रीवास्तव खरोखरच ३ राज्यांत मतदार आहे? समोर आली अशी माहिती  
4
'त्यांच्या मेंदूची चीप चोरीला गेलीये, म्हणून ते...'; CM देवेंद्र फडणवीस राहुल गांधींच्या ECI वरील आरोपांवर भडकले
5
Asia Cup 2025 मध्ये IND vs PAK सामना रद्द होणार का? दुबईतून आली मोठी अपडेट
6
या पाच कारणांमुळे डोनाल्ड ट्रम्प भडकलेत; म्हणून भारतावर कर लावलेत
7
येसूबाई अन् 'शंभुराज'! प्राजक्ता गायकवाडचा झाला साखरपुडा; होणाऱ्या नवऱ्यासोबत फोटोशूट
8
VIDEO : सॉरी सॉरी...! वैभव सूर्यवंशीची पॉवर; गोळीच्या वेगानं मारला चेंडू; बचावासाठी कॅमेरामनची 'कसरत'
9
ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी सॅमसंगने आणलाय 5G फोन, किंमतही कमी!
10
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मोठा घोटाळा, राहुल गांधी यांनी सादर केले पुरावे, मतदार यादीतील घोळ केला उघड   
11
धुळ्यात ईव्हीएम स्ट्राँगरूम बाहेर ड्युटीवर असताना पोलिसाने स्वतःवरच झाडली गोळी
12
संजू सॅमसन राजस्थानची साथ सोडणार, मॅनेजमेंटकडे रिलीज करण्याची विनंती; पण नियम काय सांगतो?
13
"राहुल गांधी यांचा हा करंटेपणा, त्यांना..."; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे का संतापले?
14
मंदिरात आला, पिंडीवर जल अर्पण केले, हात जोडले आणि तिथली भांडी चोरली, सीसीटीव्हीमध्ये रेकॉर्ड झाली चोरी
15
Asia Cup 2025 Hockey : पाकिस्तानची माघार; भारतात येऊन खेळण्यास दिला नकार, आता...
16
नागरिकांचं आरोग्य महत्त्वाचं, आदेशाचा अवमान करू नका; मुंबई उच्च न्यायालयाने पिळले कान
17
प्रेमाच्या नादात नातंच विसरले! २ मुलांच्या आईने भाच्याशी केलं लग्न, नवऱ्याला पाठवले फोटो
18
Aisa Cup 2025: सूर्यकुमार यादव संघात नसेल तर कर्णधार कोण? 'या' ३ खेळाडूंमध्ये चुरशीची स्पर्धा
19
कुबेरेश्वर धाममध्ये आणखी ३ भाविकांचा मृत्यू; आतापर्यंत ७ जणांनी गमावला जीव, कारण काय..?
20
रशियाचे राष्ट्राध्यक्ष भारतात येणार, ट्रम्प यांच्या 'दबावतंत्रा'वर मोदी-पुतीन तोडगा काढणार!

‘शासकीय जावयाला’ वैतागले सोलापूर जिल्ह्यातील रेशन दुकानदार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 9, 2018 13:14 IST

जिल्ह्यातील १५०० रेशन दुकानदारांनी शासकीय गोदामातून धान्य न उचलण्याचा घेतला निर्णय

ठळक मुद्देग्रामीण भागातील ४ लाखांहून अधिक रेशन कार्डधारकांना फटका बसणार सोलापूर शहरात आणि जिल्ह्यात धान्य पोहोचविण्याचा ठेका मुंबईच्या क्रिएटिव्ह कंझ्युमर्स सोसायटीला मिळाला जिल्हा पुरवठा अधिकारी श्रीमंत पाटोळे यांनी ठेकेदाराला नोटिसा बजावल्या

सोलापूर : द्वारपोच धान्य योजनेतून रास्त भाव धान्य दुकानांपर्यंत मोफत धान्य पोहोचणे अपेक्षित आहे. परंतु, शासनाने नेमलेला ‘खास’ वाहतूक कंत्राटदार ग्रामीण भागातील दुकानदारांकडून आजही वाहतूक व हमाली वसुली करीत आहे. जिल्हा प्रशासन, पुरवठा विभाग त्याला १५ नोटिसा बजावल्याचे सांगत आहे. ही वसुली बंद होत नसल्याने ग्रामीण भागातील १५०० रेशन दुकानदारांनी तालुका गोदामातून धान्य न उचलण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचा फटका ग्रामीण भागातील ४ लाखांहून अधिक रेशन कार्डधारकांना बसणार आहे. पुरवठा विभाग आणि दुकानदार यांच्या संगनमताने होणारा धान्याचा काळाबाजार रोखण्यासाठी आघाडी सरकारने द्वारपोच धान्य योजना सुरू केली होती. वाहतूक खर्च न लागता दुकानदारांना धान्य मिळावे, दुर्गम भागातही धान्य मिळावे हासुद्धा यामागचा उद्देश होता. परंतु, कंत्राटदारांमधील कमिशनखोरीच्या हव्यासात या योजनेला हरताळ फासला जात आहे.

रास्त भाव धान्य दुकानदार, हॉकर्स संघटनेचे सचिव सुनील पेंटर म्हणाले, सोलापूर शहरात आणि जिल्ह्यात धान्य पोहोचविण्याचा ठेका मुंबईच्या क्रिएटिव्ह कंझ्युमर्स सोसायटीला मिळाला आहे. या सोसायटीने पुन्हा रूपेश हरबा यांना वाहतुकीचे कंत्राट दिले आहे. सोलापूरच्या मुख्य शासकीय गोदामात धान्य पोहोचल्यानंतर ते तालुका पातळीवरील गोदामात पोहोचविले जाते. तालुका गोदामातून थेट दुकानदारांपर्यंत पोहोचविण्यासाठी रूपेश हरबा यांनी पुन्हा वेगळे कंत्राटदार नेमले आहेत. हे तालुका पातळीवरील कंत्राटदार ग्रामीण भागातील रास्त भाव धान्य दुकानदारांकडून वसुली करीत आहेत. या वसुलीला दुकानदारांचा आक्षेप आहे. 

मंत्रालयातील संबंधांच्या जोरावरच्शहरातील दुकानांपर्यंत व्यवस्थित धान्य पोहोचते, पण ग्रामीण भागातील काम नेहमीच विस्कळीत असते. यासंदर्भात जिल्हा पुरवठा अधिकारी श्रीमंत पाटोळे यांनी ठेकेदाराला नोटिसा बजावल्या आहेत. परंतु, ठेकेदार अधिकाºयांना जुमानत नाही. मंत्रालयातील संबंधाच्या जोरावर तो कारवाई होऊ देत नसल्याची चर्चा आहे.

धान्य पोहोचविण्यासाठी नेमलेल्या कंत्राटदाराबद्दल अनेक तक्रारी येत आहेत. त्याला १५ पेक्षा जास्त नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. रेशन दुकानदारांनी धान्य घेतलेच पाहिजे. ठेकेदाराने वाहतूक आणि हमालीचे पैसे घेतले असतील तर त्याच्या पावत्या जोडाव्यात. ठेकेदाराच्या बिलातून हे पैसे वजावट करण्यात येतील, पण दुकानदारांना धान्य घ्यावेच लागेल. - श्रीमंत पाटोळे, जिल्हा पुरवठा अधिकारी, सोलापूर.

दिवाळीच्या तोंडावर वरिष्ठ अधिकाºयांच्या सांगण्यावरून ग्रामीण भागातील दुकानदारांनी हमाली व वाहतुकीचा खर्च करून धान्य आणले. मूळत: हे काम ठेकेदारांनीच करणे अपेक्षित आहे. परंतु, पुरवठा विभागातील अधिकारी दुकानदारांना दम देऊन धान्य उचलण्यास भाग पाडत आहेत. खरे तर शासकीय अधिकाºयांनी ठेकेदाराला दम देऊन वसुली बंद केली पाहिजे. त्याऐवजी ते दुकानदारांना त्रास देत आहेत. यामुळेच ग्रामीण भागात धान्य उचलले जाणार नाही. - सुनील पेंटर, सचिव, रास्त भाव धान्य दुकानदार हॉकर्स संघ, सोलापूर 

टॅग्स :SolapurसोलापूरSolapur Collector Officeसोलापूर जिल्हाधिकारी कार्यालय