‘आदिनाथ’च्या कामगारांचा थकीत पगार मागणीसाठी ‘रास्ता रोको’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 22, 2021 04:20 IST2021-01-22T04:20:48+5:302021-01-22T04:20:48+5:30
आदिनाथ सहकारी साखर कारखान्यातील कामगारांचा थकीत पगार, ऊसतोडणी वाहतूकदार व ऊस उपादकांची बिले मिळण्यासाठी शेतकरी कामगार संघर्ष ...

‘आदिनाथ’च्या कामगारांचा थकीत पगार मागणीसाठी ‘रास्ता रोको’
आदिनाथ सहकारी साखर कारखान्यातील कामगारांचा थकीत पगार, ऊसतोडणी वाहतूकदार व ऊस उपादकांची बिले मिळण्यासाठी शेतकरी कामगार संघर्ष समितीच्या वतीने कारखान्याच्या गेटसमोर बुधवारी दुपारी टेंभुर्णी-अहमदनगर राज्यमार्गावर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात कामगार व शेतकरी महिलांसह सहकुटुंब उपस्थित होते.
आंदोलनात कोणत्याही प्रकारचा अनुसूचित प्रकार घडू नये म्हणून पोलीस निरीक्षक श्रीकांत पाडुळे यांनी आंदोलनस्थळापासून एक किलोमीटरवर गाड्या अडवून ठेवल्या. चोख बंदोबस्त ठेवला. यावेळी कांबळे म्हणाले, आम्ही कामगारांच्या पगारी रकमा मिळाव्यात व शेतकरी तोडणी वाहतूकदाराचे पैसे मिळावेत म्हणून अनेक वेळा संघर्ष केला. नेत्या रश्मी बागल-कोलते व एकही संचालक उपोषणस्थळी कामगारांच्या भेटीलाआले नाहीत. या उलट कारखान्यातील कामगारांच्या कॉलनीतील विजेचे व नळजोडणी बंद केली होती. संघर्ष करूनही पगारी सुट्टी मिळत नाहीत म्हणून चार कामगारांना जीव गमवावा लागला. कारखान्याची मोठी संपत्ती असताना कामगारांच्या पगारी व तोडणी वाहतूकदाराची बिले देण्याएवढी साखरेची पोती शिल्लक असतानाही स्वत:च्या स्वार्थासाठी कारखाना गहाण ठेवला.
आंदोलकांचे निवेदन नायब तहसीलदार बदे व साहाय्यक पोलीस निरीक्षक दिलीप तळपे, कारखान्याचे कार्यकारी संचालक बागनवर यांनी स्वीकारले.
............................
===Photopath===
210121\21sol_3_21012021_4.jpg
===Caption===
आदिनाथ सह,साखर कारखान्यातील कामगारांच्या थकित पगार मागणीसाठी रस्ता रोको आंदोलन करताना कामगार,शेतकरी व महिला.