सोलापूरात राष्ट्रवादी व एमआयएमच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा, माजी उपमहापौरास मारहाण
By Admin | Updated: February 19, 2017 13:41 IST2017-02-19T13:41:40+5:302017-02-19T13:41:40+5:30
सोलापूरात राष्ट्रवादी व एमआयएमच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा, माजी उपमहापौरास मारहाण

सोलापूरात राष्ट्रवादी व एमआयएमच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा, माजी उपमहापौरास मारहाण
सोलापूरात राष्ट्रवादी व एमआयएमच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा, माजी उपमहापौरास मारहाण
सोलापूर : नई जिंदगी परिसरात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी व एमआयएम पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये किरकोळ कारणावरून हाणामारी झाली़ या हाणामारीत दोन्ही पक्षांचे चार कार्यकर्ते जखमी झाले असून त्यांच्यावर शासकीय रूग्णालयात उपचार सुरू आहे़ याच घटनेत माजी महापौर हारूण सय्यद यांनाही मारहाण करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे़
सोलापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी प्रचाराचा आज शेवटचा दिवस आहे़ नईजिंदगी परिसरातील हॉटेल अमन समोरून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी व एमआयएम पक्षाची प्रचार रॅली जात होती़ यावेळी किरकोळ कारणावरून दोन्ही पक्षातील कार्यकर्त्यांमध्ये प्रथम शिवीगाळ झाली़ नंतर या शिवीगाळीचे रूपांतर हाणामारीत झाले़ त्यामुळे या परिसरात काही काळ तणावाचे वातावरण पसरले होते़
या हाणामारीत इम्रान कलीम शेख (वय ३५ रा़ सिध्देश्वर नगर, सोलापूर), सादीक चाँद शेख (वय ४५ रा़ लोकमान्य नगर, सोलापूर), आसिफ फरीद शेख (वय ३५ रा़ सिध्देश्वर नगर, सोलापूर), जावेद मुस्तफा कल्याणी (वय २८ रा़ साईनाथ नगर, सोेलापूर) हे चार जण गंभीर जखमी झाले आहेत़ या चौघांवर शासकीय रूग्णालयात उपचार सुरू आहेत़ या घटनेची माहिती समजताच पोलीस उपायुक्त अपर्णा गिते, सदर बझार पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दसुरकर, सुर्यकांत पाटील यांच्यासह अन्य शहर पोलीस दलातील अधिकारी व कर्मचारी, कमांडो उपस्थित होते़ यावेळी शासकीय रूग्णालय परिसरात मोठी गर्दी झाली होती़