शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

अक्कलकोटजवळील कुरनूर धरणावर दुर्मिळ व परदेशी पक्ष्यांची लगबग 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 2, 2018 17:29 IST

चपळगाव : अक्कलकोट तालुक्यातील कुरनूर धरण परिसरात  अनेक दिवसांपासून दुर्मिळ पक्ष्यांसह परदेशी पक्ष्यांचे वास्तव्य वाढते आहे. हे धरण पक्ष्यांचे माहेरघर ठरते आहे.अक्कलकोट तालुक्याच्या उत्तर भागातील कुरनूर धरण परिसरासह चपळगाव, बावकरवाडी, सिंदखेड, कुरनूर, बºहाणपूर, डोंबरजवळगे, हन्नूर, दहिटणे, मोट्याळ,  चुंगी, चपळगाववाडी, तीर्थ, हालहळ्ळी(अ) यांसह अनेक गावांच्या परिसरातील भौगोलिक परिस्थिती या दुर्मिळ पक्ष्यांना ...

ठळक मुद्देसोलापूर जिल्ह्यात पक्ष्यांच्या एकूण २७४ जाती आढळतातकुरनूर धरणात काही ठिकाणी बेटासारखी जमीन नामशेष होण्याच्या मार्गावर असलेले काही पक्षीदेखील येथे वास्तव्यास

चपळगाव : अक्कलकोट तालुक्यातील कुरनूर धरण परिसरात  अनेक दिवसांपासून दुर्मिळ पक्ष्यांसह परदेशी पक्ष्यांचे वास्तव्य वाढते आहे. हे धरण पक्ष्यांचे माहेरघर ठरते आहे.

अक्कलकोट तालुक्याच्या उत्तर भागातील कुरनूर धरण परिसरासह चपळगाव, बावकरवाडी, सिंदखेड, कुरनूर, बºहाणपूर, डोंबरजवळगे, हन्नूर, दहिटणे, मोट्याळ,  चुंगी, चपळगाववाडी, तीर्थ, हालहळ्ळी(अ) यांसह अनेक गावांच्या परिसरातील भौगोलिक परिस्थिती या दुर्मिळ पक्ष्यांना पोषक ठरत असल्याने येथे हे पक्षी मोठ्या प्रमाणावर वास्तव्य करीत असल्याचे नेचर कॉन्झर्व्हेशनचे शिवानंद हिरेमठ यांनी सांगितले. 

हरणा आणि बोरी नदीच्या संगमावर बांधलेल्या कुरनूर धरणात काही ठिकाणी बेटासारखी जमीन आहे. येथे मोठ्या प्रमाणावर झाडे आहेत. तसेच जुन्या बावकरवाडीतील पडकी घरे या पक्ष्यांसाठी लाखमोलाचे ठरत असल्याने दुर्मिळ पक्ष्यांसह नामशेष होण्याच्या मार्गावर असलेले काही पक्षीदेखील येथे वास्तव्यास असल्याचे आढळले आहे. धरण परिसरातील शेतातील मिळणारे अन्न, बेटांसारख्या भागावरील झाडी-झुडपांवर निवाºयाची व्यवस्था तसेच पडक्या घरांमुळे निर्मनुष्य वस्तीत मिळणारी सुरक्षितता या पोषक वातावरणामुळे येथे मोठ्या प्रमाणावर पक्षी येत आहेत.

सोलापूर जिल्ह्यात पक्ष्यांच्या एकूण २७४ जाती आढळतात अशी नोंद आहे. नेचर कॉन्झर्वेशनच्या सर्वेक्षणानुसार छायाचित्र व व्हिडीओजच्या नोंदीतून २३५ जातीचेच पक्षी असल्याचे निदर्शनास येते. या पठारी प्रदेशातील पोषक स्थिती दुर्मिळ पशुपक्ष्यांना वास करण्यास भाग पाडते, यामुळे येथे काही वर्षांपूर्वी दिल्लीतील पर्यावरण संरक्षण विभागाचे संचालक हबीब  बिलाल (काश्मिर) व सध्या अमेरिकेत पशू पक्ष्यांविषयी पीएच.डी.करीत असलेल्या दिल्लीच्या गीता अग्रवाल यांनी कित्येक दिवस अभ्यासदेखील केला आहे.

उजनी धरणांसह इतर जलसाठ्यांच्या तुलनेत कुरनूर धरणाची भौतिक व भौगोलिक परिस्थिती आगळीवेगळी ठरत असल्याने परदेशी, दुर्मिळ आणि नामशेष होण्याच्या मार्गावर असलेले पक्षी येथे मोठ्या प्रमाणावर वास्तव्य करीत आहेत. यामुळे भविष्यात या दुर्मिळ  पक्ष्यांच्या संख्येत वाढ होण्यासाठी, तसेच नामशेष होत चाललेल्या पक्ष्यांच्या जाती जतन करण्यासाठी कुरनूर धरणावर  पक्षी निरीक्षण केंद्र उभारल्यास पर्यावरणाचे संरक्षण होण्यास मदत होणार आहे. सध्यपरिस्थितीत एनसीसीएसचे (नेचर कॉन्झर्वेशन सर्कल, सोलापूर) प्रमुख भरत छेडा यांच्या नेतृत्वाखाली चपळगावचे शिवानंद हिरेमठ,सचिन पाटील,महादेव डोंगरे व रत्नाकर हिरेमठ यांनी अनेक वर्षांपासून या परिसरात याविषयी अभ्यास सुरू ठेवला आहे.

कुरनूर धरणावरील पक्षी....

  • - हरियाल (महाराष्ट्र राज्यपक्षी)
  • - फ्लेमिंगो(रोहित)
  • - युरेशियन कर्लिव्ह(युरेशियन कुरव, हा पक्षी विशेषत: उत्तर आशियातच आढळतो, परंतु तेथून स्थलांतरित होऊन कुरनूर धरणावर पोहोचला हा पक्षी)
  • - एशियन पाईड स्टर्लिंग(रंगीत मैना-आपल्या येथील मैना पक्ष्यापेक्षा वेगळ्या स्वरूपातील पक्षी)
  • - बार हेडेड गुज (पट्टकादंब- हिमालय पर्वताएवढ्या उंचीइतक्या वरून उडणारा हा पक्षी)
  • - आॅ स्प्रे(कैकर)
  • - रोज फिंच(गुलाबी चटक)
  • - पेरीग्रीन फाल्कन(बहिरी ससाणा)
  • - ब्ल्यू थ्रोट(शंकर)
  • ४ब्लॅक नेप्ड मोनॉर्च(नीलमणी)
  • - इसाबिलीन व्हिटर(मातकट रणगोजा-शेपूट टोक काळा, पंख व खांदा काळा इतर भाग फिकट तपकिरी असलेला हा पक्षी धरण परिसरातील माळरानावर हिवाळी पाहुणा म्हणून दिसला आहे.)

या भागात विशेष पक्षी

  • - टेरेक शॅड पाईपर (उलट चोच तुतारी-विशेषत: समुद्रकिनारी आढळणारा हा पक्षी. स्थलांतरित पक्षी थोडे दिवस राहतो व पुन्हा निघून जातो.)
  • - व्हॉईट ब्रोड (खरबूलबूल)
  • - स्पॉटेड डव्ह (ठिपकेदार व्होला)
  • - अमूर फाल्कन (अमूर ससाणा)
  • - वर्डिएटर प्लाय कॅचअप (निलांग-सोलापूर जिल्ह्यातून हा पक्षी केवळ कुरनूर धरण परिसरात दिसतो.)
  • - इंडियन स्कीमर (या पक्ष्यांची संख्या दिवसेंदिवस कमी झाली आहे.नष्ट होण्याच्या मार्गावर असलेला हा पक्षी  कुरनूर धरण परिसरात दिसला.)
टॅग्स :Solapurसोलापूरbirds sanctuaryपक्षी अभयारण्यDamधरणtourismपर्यटन