हत्तीकणबस येथे महिलेवर बलात्कार
By Admin | Updated: June 15, 2014 00:47 IST2014-06-15T00:47:14+5:302014-06-15T00:47:14+5:30
हत्तीकणबस शिवारात एका महिलेवर बलात्कार

हत्तीकणबस येथे महिलेवर बलात्कार
अक्कलकोट : तालुक्यातील हत्तीकणबस शिवारात एका महिलेवर बलात्कार केल्याची घटना १३ जून रोजी दुपारी १२ वाजता घडली़ याबाबत उत्तर पोलीस ठाण्यात नोंद झाली आहे़
पीडित महिला माहेरी हत्तीकणबस येथे आली होती़ ती शेतात आईसोबत गेली होती़ आई शेतात काम करीत असताना पीडित महिला त्याच शेतात थोड्या अंतरावर काही कामानिमित्त गेली़ ही संधी साधून तिच्यावर पाळत ठेवून असलेला अंबाजी हणमंत पंचमगेरी याने बलात्कार केला़
पीडित महिलेवर सोलापुरातील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत़ अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक जगताप करीत आहेत़