स्वतंत्र पाणीपुरवठ्यासाठी रणजितसिंह मोहिते-पाटील यांनी घेतली महसूलमंत्र्यांची भेट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2021 04:26 IST2021-08-28T04:26:31+5:302021-08-28T04:26:31+5:30
आ. रणजितसिंह मोहिते-पाटील यांनी तिन्ही गावांच्या मागणीसाठी स्वतंत्र पत्रे देऊन सदरची मागणी केली आहे. खुडूसची लोकसंख्या सुमारे १० हजार ...

स्वतंत्र पाणीपुरवठ्यासाठी रणजितसिंह मोहिते-पाटील यांनी घेतली महसूलमंत्र्यांची भेट
आ. रणजितसिंह मोहिते-पाटील यांनी तिन्ही गावांच्या मागणीसाठी स्वतंत्र पत्रे देऊन सदरची मागणी केली आहे. खुडूसची लोकसंख्या सुमारे १० हजार असून नागरी वसाहत मोठी आहे. हे गाव संत ज्ञानेश्वर महाराज पालखी मार्गावरील प्रमुख गाव आहे. यामुळे शेळ्या-मेंढ्या चरण्यासाठी इतर क्षेत्र नसल्याने ग्रामपंचायतीने चराऊ कुरण व पाणीपुरवठ्यासाठी खुडूस येथील गट नं. ८०१/१ या शासकीय जमिनीतील १५ एकर जमीन ग्रामपंचायतीस मिळावी, अशी मागणी केली आहे.
डोंबाळवाडी (खु.) गावची लोकसंख्या सुमारे १८०० असून ग्रामपंचायतीला पेयजल योजना मंजूर झाली होती. या गावच्या पाणीपुरवठ्यासाठी खुडूस येथील गट क्र. ८०१/१ मधील पाच एकर जमीन, झंजेवाडीची लोकसंख्या सुमारे १ हजार असून भविष्यातील वाढती लोकसंख्या विचारात घेऊन पाणीपुरवठ्यासाठी खुडूस येथील गट नं. ८०१/१ या शासकीय जमिनीतील पाच एकर जमीन मिळावी, अशी मागणी केली आहे.
-----
आ. रणजितसिंह मोहिते-पाटील यांनी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांची भेट घेतली.