शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
7
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
8
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
9
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
10
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
11
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
12
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
13
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
14
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
15
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
16
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
17
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
18
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
19
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
20
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार

रमेश कदम जामिनावर.. माने अन् कोठे अद्याप गॅसवर; घरवापसी म्हेत्रेंची.. करमाळ्यात झुंज सावंत-शेवाळेंची !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 2, 2019 12:00 IST

दोन्ही देशमुखांना तिकीट जाहीर; बार्शीत सेनेकडून सोपल, मोहोळमध्ये यशवंत मानेंनी भरला अर्ज, रमेश कदमही लढणार

ठळक मुद्देविधानसभा निवडणुका जाहीर होण्यापूर्वीपासूनच होत असलेल्या घाऊक पक्षांतरामुळे उमेदवारी वाटपाची प्रक्रियाही लक्षवेधी सोलापूर शहर उत्तर मतदारसंघात अन्य पर्यायावर पडदा टाकत भाजपने पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांनाच उमेदवारी दिली सोलापूर शहर उत्तरमध्ये शिवसेनेची उमेदवारी मिळविण्यात पक्षाचे जिल्हाप्रमुख महेश कोठे आणि कॉँग्रेसमधून शिवसेनेत आलेले दिलीप माने यांच्यात जोरदार स्पर्धा

सोलापूर : विधानसभा निवडणुका जाहीर होण्यापूर्वीपासूनच होत असलेल्या घाऊक पक्षांतरामुळे उमेदवारी वाटपाची प्रक्रियाही लक्षवेधी ठरत असून सोलापूर शहर उत्तर मतदारसंघात अन्य पर्यायावर पडदा टाकत भाजपने पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांनाच उमेदवारी दिली आहे. सोलापूर दक्षिणमध्ये सहकारमंत्री सुभाष देशमुख सत्ताधारी पक्षाकडून लढणार आहेत. सोलापूर शहर उत्तरमध्ये शिवसेनेची उमेदवारी मिळविण्यात पक्षाचे जिल्हाप्रमुख महेश कोठे आणि कॉँग्रेसमधून शिवसेनेत आलेले दिलीप माने यांच्यात जोरदार स्पर्धा आहे. भाजपच्या उमेदवारीसाठी प्रयत्नशील असलेल्या सिद्धाराम म्हेत्रे यांना अखेर उमेदवारी देऊन कॉँग्रेसने तारले आहे. करमाळ्यात सेनेच्या उमेदवारीसाठी रश्मी बागल आणि विद्यमान आमदार नारायण पाटील यांच्यात रस्सीखेच सुरू आहे.

बार्शी मतदारसंघात शिवसेनेने सोपल यांना उमेदवारी दिली असून भाजपचे राजेंद्र राऊत आता काय भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष आहे. तर मोहोळ मतदारसंघात यशवंत माने यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला असून ते राष्ट्रवादीचे उमेदवार असतील मात्र पक्षाने अद्याप त्यांना ए-बी फॉर्म दिलेला नाही. या मतदारसंघात अण्णाभाऊ साठे महामंडळ भ्रष्टाचार प्रकरणात तुरूंगात असलेले विद्यमान आमदार रमेश कदम यांना जामीन मंजूर झाला असून तेही निवडणुकीच्या आखाड्यात उतरणार आहेत. ५ आॅक्टोबर रोजी ते उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.

शिवसेनेच्या करमाळा आणि शहर मध्यच्या उमेदवारीवरून ‘मातोश्री’वर विद्यमान जिल्हा संपर्क प्रमुख डॉ. तानाजी सावंत विरुद्ध माजी जिल्हा संपर्क प्रमुख खासदार राहुल शेवाळे असा संघर्ष उभा राहिला आहे. या दोन्ही जागांसंदर्भात बुधवारी ‘मातोश्री’वर पुन्हा बैठका होणार आहेत. 

शहर मध्यसाठी जिल्हाप्रमुख महेश कोठे आणि माजी आमदार दिलीप माने तर करमाळ्यासाठी नारायण पाटील आणि रश्मी बागल मुंबईत तळ ठोकून आहेत. शहर मध्यवर सुरुवातीला जिल्हाप्रमुख महेश कोठे यांची दावेदारी होती. परंतु, जिल्हा संपर्कप्रमुख तानाजी सावंत यांनी काँग्रेसचे माजी आमदार दिलीप माने यांना शिवसेनेत आणले. माने यांनी पूर्वीच्या सोलापूर दक्षिण मतदारसंघातून निवडणूक लढविली आहे. आक्रमक यंत्रणा, संस्थांचे पाठबळ यामुळे ते काँग्रेसच्या आमदार प्रणिती शिंदे यांच्या विरोधात चांगली लढत देतील, असे तानाजी सावंत यांना वाटते. माजी जिल्हा संपर्क प्रमुख राहुल शेवाळे यांच्या काळात महेश कोठे यांचा शिवसेनेत प्रवेश झाला. कोठे यांनी २०१४ साली चांगली लढत दिली होती. या भागात त्यांची मतपेढी आहे. नगरसेवक त्यांच्यासोबत आहेत. पक्षाने त्यांना तयारी करायला सांगितल्याने त्यांनाच उमेदवारी द्यावी, असे खासदार राहुल शेवाळे यांना वाटते. विशेष म्हणजे शेवाळे यांच्या बाजूने खासदार संजय राऊत आणि सार्वजनिक बांधकाममंत्री एकनाथ शिंदे यांनी उडी घेतली आहे.

करमाळ्यात बेरजेच्या राजकारणात नारायण पाटील कमी पडू शकतील, असा दावा करून सावंत यांनी बागल यांच्या उमेदवारीसाठी आग्रह धरला आहे. डॉ. सावंत यांनी उमेदवारी मिळवून देऊ, या आश्वासनावरच बागल यांना शिवसेनेत आणले आहे. पाटील यांचा राहुल शेवाळे यांच्याशी पूर्वीपासून संपर्क आहे. शेवाळे मुंबईतील कामांमध्ये व्यस्त होते. त्यामुळे पाटील दुपारपर्यंत त्यांची वाट पाहत मातोश्रीबाहेर थांबले होते. सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमाराला खासदार राहुल शेवाळे, आमदार नारायण पाटील, तालुका प्रमुख महेश चिवटे यांनी ठाकरे यांची भेट घेतली. 

तानाजी सावंत यांना दूर का ठेवले? - माढा विधानसभा मतदारसंघातील उमेदवारीचा तिढा सोडविण्यासाठी तानाजी सावंत यांनी मंगळवारी पुण्यात बैठक बोलावली होती. त्यांच्या अनुपस्थितीत उद्धव ठाकरे यांनी मंगळवारी सायंकाळी करमाळा आणि शहर मध्यसाठी बैठक घेतली. राहुल शेवाळे यांनी करमाळ्यातील उमेदवारीसाठी आमदार नारायण पाटील आणि रश्मी बागल यांच्यासोबत बुधवारी दुपारी १ वाजता बैठक घ्यावी. या बैठकीनंतर काय ठरेल, त्याचा निरोप मला द्यावा. त्यानुसार मी उमेदवारी जाहीर करेन, असे उद्धव ठाकरे यांनी सांगितले. शहर मध्यच्या उमेदवारीबाबत बुधवारी निर्णय होणार आहे. 

टॅग्स :Solapurसोलापूरvidhan sabhaविधानसभाElectionनिवडणूकPoliticsराजकारणmadha-acमाधाsolapur-city-central-acसोलापूर सिटी सेंटरsolapur-city-north-acसोलापूर शहर उत्तर