लाखापुढील व्यवहारावर राहणार आयोगाची ‘नजर’ : रणजितकुमार

By Admin | Updated: January 28, 2017 12:51 IST2017-01-28T12:51:36+5:302017-01-28T12:51:36+5:30

लाखापुढील व्यवहारावर राहणार आयोगाची ‘नजर’ : रणजितकुमार

Rakhiyakkumar: 'eyes' of the commission to be followed by lakhs | लाखापुढील व्यवहारावर राहणार आयोगाची ‘नजर’ : रणजितकुमार

लाखापुढील व्यवहारावर राहणार आयोगाची ‘नजर’ : रणजितकुमार

लाखापुढील व्यवहारावर राहणार आयोगाची ‘नजर’ : रणजितकुमार
सोलापूर : निवडणूक काळात बँकांतून कोणी एक लाख रुपये काढले किंवा भरले तर त्याची माहिती संबंधित निवडणूक कक्षाला देण्याचे आदेश जिल्हाधिकारी रणजीत कुमार यांनी बँकांना दिले.
महापालिका, जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीसंदर्भात स्थापन करण्यात आलेल्या संनियंत्रण समितीची बैठक जिल्हाधिकारी कक्षात घेण्यात आली. महापालिका क्षेत्रासंबंधीच्या अडचणी मुख्य निवडणूक अधिकारी विजयकुमार काळम-पाटील यांनी मांडल्या. पोलीस अधीक्षक वीरेश प्रभू, निवासी उपजिल्हाधिकारी अजित रेळेकर, उपजिल्हाधिकारी रेश्मा माळी आदी उपस्थित होते. राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशाप्रमाणे निवडणुकीसाठी उमेदवारांना बँकेत नवीन खाते उघडून त्यात रक्कम भरून खर्ची करण्यास परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे संबंधित उमेदवाराचे बँकेत खाते असले तरी खास निवडणुकीसाठी नवीन खाते उघडणे बँकांना बंधनकारक आहे. बऱ्याच बँकांनी असे करण्यास नकार दिल्याच्या तक्रारी आहेत. त्यावर जिल्हाधिकारी रणजीत कुमार यांनी बैठकीला उपस्थित असलेल्या ३0 बँकांच्या प्रतिनिधींना ही सूचना दिली. उमेदवारांना तत्काळ नवीन खाते व चेकबुक देण्यात यावे तसेच एकाच दिवशी बँकेतून १ लाखाच्यावर रक्कम काढत किंवा भरत असेल तर संबंधित निवडणूक कक्षाला माहिती कळवावी.
पोलीस व राज्य उत्पादन शुल्क खात्याने ठरल्याप्रमाणे नाकाबंदी करावी. राज्य उत्पादन शुल्क खात्याने दररोज केलेल्या कारवाईचा अहवाल द्यावा. पोलिसांनी शहरात ८ ठिकाणी नाकाबंदी करून अवैधपणे पैशाची वाहतूक होऊ नये याची काळजी घ्यावी. तपासणीत आढळलेल्या पैशासोबत संबंधित व्यक्ती पुरावे देत असेल तर त्याची खातरजमा करावी. पुरावे नसतील तरच अशी रक्कम जप्त करून आयकर खात्याकडे हे प्रकरण चौकशीला द्यावे. पेट्रोलपंपधारक, व्यापाऱ्यांनी अशी रक्कम नेत असताना संबंधित व्यक्तीजवळ रकमेचे पुरावे असणारी कागदपत्रे द्यावीत. त्यामुळे पुढील गोंधळ टळेल. स्टेशन व बसस्थानकावरही पैसे, दारू व इतर गोष्टीची वाहतूक होत असेल तर याबाबत सतर्क राहावे, अशा सूचना यावेळी देण्यात आल्या.
-----------------------
५० हजारांच्या पुढे चौकशी
पोलीस नाकाबंदीत तपासणीवेळी ५० हजारांच्या पुढील रक्कम आढळली तरच सखोल चौकशी करण्यात यावी. एखाद्या व्यक्तीजवळ १० हजार, २० किंवा २५ हजार असे खर्चाचे पैसे असतील तर चौकशीसाठी विनाकारण ताटकळत ठेवण्यात येऊ नये. आढळलेल्या कॅशसोबत बँक किंवा व्यापाऱ्याच्या खतावणीचे पुरावे असतील तर विचारात घ्या. पुरावे देणाऱ्यांची अडवणूक करू नका, अशा सूचना यावेळी पोलीस अधिकाऱ्यांना देण्यात आल्या.

Web Title: Rakhiyakkumar: 'eyes' of the commission to be followed by lakhs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.