राजाराम दगडे यांचे निधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2021 04:22 IST2021-05-12T04:22:50+5:302021-05-12T04:22:50+5:30

अकलूज : राजाराम बळीराम दगडे (९०, रा. अकलूज, ता. माळशिरस) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, तीन मुले, मुलगी, ...

Rajaram Dagde passed away | राजाराम दगडे यांचे निधन

राजाराम दगडे यांचे निधन

अकलूज : राजाराम बळीराम दगडे (९०, रा. अकलूज, ता. माळशिरस) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, तीन मुले, मुलगी, सुना, नातवंडे असा परिवार आहे. ते शिक्षक धर्मराज दगडे यांचे वडील होत.

शरणप्पा हल्ले

सोलापूर : माजी सरपंच शरणप्पा धुळप्पा हल्ले (६८, रा. आहेरवाडी, ता. दक्षिण सोलापूर) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात दोन मुले, दोन मुली, सुना व नातवंडे असा परिवार आहे.

डॉ. भीमगोंडा हाविनाळे

उडगी : डॉ. भीमगोंडा रेवप्पा हाविनाळे (९०, रा. सिंधखेड, ता. दक्षिण सोलापूर) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात एक मुलगा, एक मुलगी, सून, नातवंडे असा परिवार आहे. ते धारवाड येथील कर्नाटक विद्यापीठात रसायन शास्त्राचे माजी विभाग प्रमुख होते.

अमोगसिद्ध कोंजारी

सोलापूर : अमोगसिद्ध भीमशा कोंजारी (६२, रा. मंद्रूप, ता. दक्षिण सोलापूर) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, मुलगी असा परिवार आहे. ते राकेश कोंजारी यांचे वडील होत.

रत्नाबाई चिंचोळी

चपळगाव : रत्नाबाई गुरुशांत चिंचोळी-माळी (६०, रा. डोंबर जवळगे, ता. अक्कलकोट) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात दोन मुले, सून व नातवंडे असा परिवार आहे.

ललिता म्हंता

सोलापूर : ललिता राजेंद्र म्हंता (६७, रा. हुडको नं. ३) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात तीन मुले, सुना, नातवंडे असा परिवार आहे. अक्कलकोट एस. टी. आगाराचे व्यवस्थापक रमेश म्हंता यांच्या त्या मातोश्री होत.

गुरुबसय्या मठ

अक्कलकोट : वेदमूर्ती शिवनिंगय्या गुरुबसय्या मठ-स्वामी (७८, रा. सातनदुधनी, ता. अक्कलकोट) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, तीन मुली, सुना व नातवंडे असा परिवार आहे.

Web Title: Rajaram Dagde passed away