सोलापूर शहरात पाऊस

By Admin | Updated: July 7, 2014 01:05 IST2014-07-07T01:05:36+5:302014-07-07T01:05:36+5:30

शहरातील काही भागात पावसाच्या सरी

Rain in Solapur city | सोलापूर शहरात पाऊस

सोलापूर शहरात पाऊस


सोलापूर : अनेक दिवसांच्या विश्रांतीनंतर आज दुपारी आणि सायंकाळी शहरातील काही भागात पावसाच्या सरी कोसळल्या़ पावसाने शहराबरोबर ग्रामीण भागालाही दिलासा दिला़
पाऊस नसल्याने ग्रामीण भागात वाईट अवस्था होती़ रोहिणी, मृग व आर्द्रा नक्षत्र कोरडे गेल्याने शेतकऱ्यांच्या तोंडचे पाणी पळाले होते. खरिपाच्या पेरण्या खोळंबल्या ़ शहरात कडक ऊन व उकाडा जाणवत होता़ भरदुपारी घामाच्या धारा निघायच्या़ आज दिवसभरात ढगाळलेले वातावरण पाहायला मिळाले़ दुपारी जुळे सोलापूरसह हद्दवाढ भागात पावसाच्या सरी कोसळल्या़ सायंकाळी हवेत गारवा निर्माण झाला़ 

Web Title: Rain in Solapur city

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.