पाऊस नगरमध्ये, पाणी करमाळ्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2021 04:28 IST2021-09-07T04:28:11+5:302021-09-07T04:28:11+5:30
गेल्या वर्षी जुलैमध्येच सीना नदीला पाणी आले होते. या वर्षी ऑगस्टपर्यंत समाधानकारक पाऊस न पडल्याने सीना कोरडीच होती. त्यातच ...

पाऊस नगरमध्ये, पाणी करमाळ्यात
गेल्या वर्षी जुलैमध्येच सीना नदीला पाणी आले होते. या वर्षी ऑगस्टपर्यंत समाधानकारक पाऊस न पडल्याने सीना कोरडीच होती. त्यातच दोन दिवसांपूर्वी नगर जिल्ह्यात झालेल्या पावसाने सीना नदीला पाणी आले आहे. हवामान विभागाने आणखी मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे. त्यामुळे पाऊस झाला तर आणखी पाणी वाढणार आहे. सीना नदीवर करमाळा तालुक्यात खडकी, तरटगाव, पोटेगाव व संगोबा असे चार कोल्हापुरी पद्धतीचे बंधारे आहेत. हे बंधारे भरले तर उन्हाळ्यापर्यंत शेतकऱ्यांना शेतीला पाणी पुरते. या वर्षी निम्मा पावसाळा झाला तरी सीना नदीला पाणी आले नव्हते. मात्र, सोमवारी (ता. ६) सीना नदीला पाणी आल्याने आनंद व्यक्त केला जात आहे. आळजापूरजवळील सीना नदीच्या संगमापर्यत पाणी आले आहे.