शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
3
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
4
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
5
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
6
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
7
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
8
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
9
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
10
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
11
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
12
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
13
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
14
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
15
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
16
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
17
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
18
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
19
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
20
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
Daily Top 2Weekly Top 5

सोलापूर जिल्ह्यात विजेवर रेल्वे धावली; भिगवण ते वाशिंबे विद्युतीकरण झाले पूर्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2020 12:39 IST

सर्वच चाचण्या यशस्वी : मध्य रेल्वेच्या सोलापूर विभागात दुहेरीकरण, विद्युतीकरणाच्या कामाने घेतली गती

ठळक मुद्देसोलापूर-पुणे रेल्वे मार्गावर रेल्वेचे विद्युतीकरण काम वेगाने सुरू ३५ किलोमीटरच्या अंतरावरील विद्युतीकरणाचे काम पूर्ण झाले भिगवण ते भाळवणीपर्यंत दुहेरीकरणाचे काम वेगाने पूर्ण करण्यात आले़

सोलापूर : मध्य रेल्वेच्यासोलापूर विभागातून पुणे, मुंबईकडे जाणाºया रेल्वे मार्गावरील भिगवण ते वाशिंबे रेल्वे स्टेशनदरम्यान विद्युतीकरणाचे काम पूर्ण झाले आहे. सोमवारी त्या मार्गावर रेल्वे इंजिनद्वारे चाचणी घेण्यात आली अन् ती यशस्वी झाली.

सोलापूर-पुणे रेल्वे मार्गावर रेल्वेचे विद्युतीकरण काम वेगाने सुरू आहे़ त्या अंतर्गत भिगवण (जि़ पुणे) ते वाशिंगे (ता. करमाळा, जि़ सोलापूर) दरम्यानच्या रेल्वेमार्गावर जिंती, पारेवाडी, वाशिंबे असा एकूण ३५ किलोमीटरचे अंतर आहे़ या ३५ किलोमीटरच्या अंतरावरील विद्युतीकरणाचे काम पूर्ण झाले असून, प्रशासनाच्या वतीने घेण्यात आलेली चाचणी यशस्वी झाल्याचे रेल्वेच्या अधिकाºयांनी सांगितले़ भिगवण ते भाळवणीपर्यंत दुहेरीकरणाचे काम वेगाने पूर्ण करण्यात आले़ त्यानंतर याच मार्गावरील भिगवण ते वाशिंबेपर्यंतचे विद्युतीकरण काम पूर्ण झाले आहे़ दरम्यान, वाशिंबे ते भाळवणीपर्यंत होणाºया विद्युतीकरणाच्या कामाने गती घेतली आहे.

मध्य रेल्वेच्या सोलापूर विभागात सुरू असलेले दुहेरीकरण व विद्युतीकरणाच्या कामाने लॉकडाऊनच्या काळात गती घेतली आहे़ प्रवासी रेल्वे बंद असल्याने या कामावर फारसा परिणाम जाणवत नसल्याने दिवस-रात्र हे काम सुरू असून लवकरात लवकर हे काम पूर्ण करण्यासाठी रेल विकास निगमचे अधिकारी, कर्मचारी कार्यरत असल्याचे सांगण्यात आले. 

अंतिम चाचणीनंतरच धावणार रेल्वे...भिगवण ते वाशिंबे या ३५ किलोमीटर अंतरावरील विद्युतीकरणाचे काम पूर्ण झाले़ त्यानंतर संबंधित रेल विकास निगमच्या विद्युत विभागाच्या वतीने चाचणी घेतली़ या चाचणीत कोणताही दोष आढळून आला नाही, ती यशस्वी झाली़ आता विद्युतीकरण चाचणी कमिशनर, चीफ कमिशनर आॅफ रेल्वे सेफ्टी यांच्याकडून अंतिम चाचणी झाल्यानंतरच या मार्गावरून रेल्वे धावणार असल्याचेही रेल्वेच्या अधिकाºयांनी सांगितले.

टॅग्स :Solapurसोलापूरrailwayरेल्वेcentral railwayमध्य रेल्वे