शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

महिलांच्या सुरक्षेसाठी आरपीएफने आणला रेल्वे सुरक्षा अ‍ॅप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 8, 2018 16:48 IST

सोलापूर : रेल्वे प्रवासात महिलांच्या सुरक्षेसाठी आरपीएफने १० महिलांची एक तुकडी आणली आहे़ तसेच सुरक्षित प्रवासाच्या दृष्टीने एक अ‍ॅपदेखील विकसित केल्याची माहिती आरपीएफ सुरक्षा आयुक्त जयण्णा कृपाकर यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत दिली़ या योजनेच्या माध्यमातून महिला आणि मुलांच्या सुरक्षिततेवर अधिक भर देण्यात आला आहे़ प्रवासादरम्यान महिलांना काही अडचणी आल्यास त्यांनी आरपीएफ ...

ठळक मुद्देमहिलांच्या सुरक्षेसाठी आरपीएफने १० महिलांची एक तुकडीमहिला आणि मुलांच्या सुरक्षिततेवर अधिक भरप्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी रेल्वे सुरक्षा अ‍ॅपची निर्मिती

सोलापूर : रेल्वे प्रवासात महिलांच्या सुरक्षेसाठी आरपीएफने १० महिलांची एक तुकडी आणली आहे़ तसेच सुरक्षित प्रवासाच्या दृष्टीने एक अ‍ॅपदेखील विकसित केल्याची माहिती आरपीएफ सुरक्षा आयुक्त जयण्णा कृपाकर यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत दिली़ 

या योजनेच्या माध्यमातून महिला आणि मुलांच्या सुरक्षिततेवर अधिक भर देण्यात आला आहे़ प्रवासादरम्यान महिलांना काही अडचणी आल्यास त्यांनी आरपीएफ जवानांशी संवाद साधून आपली समस्या सांगावी़, अशी संकल्पना आहे. सोलापूर रेल्वे स्थानकात प्रथमच महिला आरपीएफ १० जणींची एक तुकडी नियुक्त करण्यात आली आहे़ 

दररोज प्रवास करणाºया महिला प्रवाशांसाठी स्पेशल व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपदेखील आरपीएफने बनविला आहे़ तसेच घरातून निघून गेलेल्या आणि हरवलेल्या मुलांसाठी ‘मुस्कान’ ही विशेष मोहीम सुरू करण्यात आली आहे़ या मोहिमेच्या माध्यमातून मागील काही दिवसांत ३० मुलांना त्यांच्या पालकांच्या हवाली करता आले आहे़ सात दिवस आणि चोवीस तास हेल्पलाईनच्या मदतीला उपलब्ध असणार आहेत़ या पत्रकार परिषदेस निरीक्षक राकेश कुमार, पवन जयस्वाल उपस्थित होते़ 

अ‍ॅपची घ्या मदत ......मध्य रेल्वेच्या वतीने प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी रेल्वे सुरक्षा अ‍ॅपची निर्मिती करण्यात आली आहे़ यामध्ये एक पॅनीक बटन देण्यात आले आहे़ अडचणीच्या वेळी हे बटन दाबल्यास जवळच्या रेल्वे पोलिसांना आणि आपल्या नातेवाईकाला आपण अडचणीत असल्याची माहिती मिळते़ यानंतर जरी मोबाईल बंद झाला तरी ट्रॅकरवरून आरपीएफ जवान मदत करू शकतील़ 

महिलांसाठी आरक्षित असलेल्या डब्यातून प्रवास करणाºया ५७६ जणांवर कारवाई क रून त्यांच्याकडून लाख रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे़ तसेच महिलांच्या सुरक्षिततेसाठी आता विशेष खबरदारी घेण्यात आली आहे़ - जयण्णा कृपाकरसुरक्षा आयुक्त, आरपीएफ 

टॅग्स :SolapurसोलापूरRailway Passengerरेल्वे प्रवासीPoliceपोलिसSocial Mediaसोशल मीडिया