शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
2
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
3
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
4
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
5
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
6
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
7
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
8
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
9
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
10
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
11
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
12
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
13
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
14
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
15
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
16
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
17
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
18
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन
19
बीडची लेक अन् जावयाची काश्मीरमध्ये पर्यटकांना मदत; दहशतवाद्यांविरोधात आंदोलनही केलं
20
सर्जिकल स्ट्राईकपेक्षा मोठा हल्ला; अजित डोभाल कामाला लागले, पाकिस्तावर मोठी कारवाई होणार?

मुळेगावात अवैध हातभट्टी दारु निर्मितीवर छापा; साडेतीन लाखांचा मुद्देमाल जप्त

By appasaheb.patil | Updated: September 28, 2022 20:02 IST

सोलापूर राज्य उत्पादन शुल्क विभागाची मोठी कारवाई

सोलापूर : राज्य उत्पादन शुल्क विभाग महाराष्ट्र राज्य चे आयुक्त  कांतीलाल उमाप, विभागीय उपायुक्त पुणे अनिल चासकर यांचे आदेशान्वये व अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, सोलापूर नितीन धार्मिक यांच्या मार्गदर्शनाखाली व उपअधीक्षक आदित्य पवार यांचे नेतृत्वात मुळेगाव तांडा ता. दक्षिण सोलापूर परिसरात अवैध हातभट्टी दारु निर्मिती व साठा ठिकांणावर राज्य उत्पादन शुल्क विभागाने 28 सप्टेंबर रोजी दुपारच्या सुमारास धाडी  रु. 3.50 लाख किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.

    सविस्तर वृत्त असे की, २८ सप्टेंबर रोजी रोजी उपअधीक्षक आदित्य पवार यांचे नेतृत्वात सामुहिक मोहिमेचे आयोजन करुन मुळेगाव तांडा ता. दक्षिण सोलापूर येथिल चिंतामणी नगर व भानुदास तांडा येथिल काही घरांमध्ये व तांड्यालगतच्या परिसरामध्ये गुप्त बातमीदारामार्फत मिळालेल्या बातमीच्या आधारे अचानक छापे मारुन सदर ठिकाणी १० वारस गुन्हे नोंद करुन फ़रार आरोपींविरुध्द  महाराष्ट्र दारुबंदी कायदा १९४९ अन्वये गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत. 

या कारवाईत १२ हजार ९४० लिटर गुळमिश्रीत रसायन, १ हजार लिटर हातभट्टी दारु, १२० किलो गुळपावडर, प्लॅस्टिक घागरी, रिकामे रबरी ट्युब, ईलेक्ट्रिक मोटार असा एकूण ३ लाख ५० हजार ४०० रूपये किंमतीचा  मुद्देमाल जप्त करुन नाश करण्यात आला आहे. या कारवाईत राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधिकारी, कर्मचारी कारवाईसाठी गेले असता गुन्ह्याच्या ठिकाणांहुन आरोपी पळुन जावुन फ़रार झालेले आहेत, त्यांचा शोध सुरु आहे. सदरची कारवाई उपअधीक्षक आदित्य पवार, निरीक्षक संभाजी फ़डतरे, सदानंद मस्करे, गुलाब जाधव, पवन मुळे, संदिप कदम व  सर्व दुय्यम निरीक्षक व जवान स्टाफ़ यांनी पार पाडली.राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून विशेष पथके नेमण्यात आली असून अवैध दारु विक्री, निर्मिती, वाहतुकीवर सातत्याने कारवाया केल्या जात आहेत. तसेच सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की, कोणत्याही ठिकाणी अवैध हातभट्टी दारु निर्मिती / वाहतूक / विक्री/ साठा, बनावट दारु, परराज्यातील दारु याबाबत माहिती मिळाल्यास या विभागास संपर्क साधावा.

 

टॅग्स :SolapurसोलापूरCrime Newsगुन्हेगारीExcise Departmentउत्पादन शुल्क विभाग