शहरं
Join us  
Trending Stories
1
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
2
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
3
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
4
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
5
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
6
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
7
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
8
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
9
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
10
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
11
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
12
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
13
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
14
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
15
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
16
'धुरंधर'मुळे पालटले या टीव्ही कलाकारांचे नशीब; कोणी आयटम साँगने गाजवले, तर कोणी अभिनयाने जिंकली मने!
17
भाजपचा यू-टर्न! आमदार देवयानी फरांदेंच्या नियुक्तीनंतर नाराजीची लाट, भाजपने आमदार ढिकलेंबद्दल केला खुलासा
18
३ लाख पगार, सरकारी घर, हवी तिथे नोकरी; बुरखा प्रकरणातील डॉ. नुसरत यांना कुणी दिली मोठी ऑफर?
19
बॉक्स ऑफिस मॉन्स्टर 'धुरंधर'सोबत 'उत्तर' रिलीज झाला अन्.., क्षितिज पटवर्धनची लक्षवेधी पोस्ट
20
सरकारच्या तिजोरीत लोकांनी भरले १७ लाख कोटी; कॉर्पोरेट, वैयक्तिक करात मोठी वाढ
Daily Top 2Weekly Top 5

सोलापुरात घरात चालणाऱ्या कुंटणखाण्यावर धाड; पीडितेची सुटका, महिलेस पोलीस कोठडी

By विलास जळकोटकर | Updated: February 10, 2024 19:17 IST

राहत्या घरामध्ये कुंटणखाणा चालवणाऱ्या एका महिलेस बोगस गिऱ्हाईकास पाठवून खात्री केली.

सोलापूर: राहत्या घरामध्ये कुंटणखाणा चालवणाऱ्या एका महिलेस बोगस गिऱ्हाईकास पाठवून खात्री केली अन् सापळा लावून या प्रकाराचा अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाने पर्दाफास केला. पिडितेच सुटका करण्यात आली. निलम श्रमजीवीनगर येथे गुरुवारी ही कारवाई करण्यात आली. कुंटणखाणा चालवणाऱ्या महिलेस अटक करुन न्यायालयापुढे उभे केले असता तिला १२ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी मिळाली आहे. शहरामध्ये छुप्या पद्धतीने कुंटणखाना सुरु असल्याची खबर अनैतिक मानवी व्यापार प्रतिबंध कक्षाच्या पथकाला खबऱ्यांकडून समजली.

त्यानुसार पोलीस निरीक्षक महादेव राऊत यांनी खबऱ्याच्या माहितीनुसार ८ फेब्रुवारी रोजी दुपारी ३:५५ च्या सुमारास निलम श्रमजीवी नगरातील मार्कंडेय चौकात जाऊन संबंधीत घरात बोगस गिऱ्हाईक पाठवून खातरजमा केली. शहानिशा केल्यानंतर सापळा लावून गंगुबाई आण्णप्पा रोकडे (वय- ५०) या महिलेला अटक केली. या सापळ्यात आढळलेल्या पिडित महिलेची सुटका करण्यात आली.

सदर महिला आपल्या स्वत:च्या घरामध्ये पिडितेची पिळवणूक करुन तिला वेश्या व्यवसाय करण्यासाठी भाग पाडत असे व तिच्या येणाऱ्या कमाईवर स्वत:ची उपजीविका करायची अशी माहिती समोर आली. सदर महिलेला अटक करुन न्यायालयापुढे उभे करण्यात आले असता तिला १२ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश बजावण्यात आला. या प्रकरणी सदर महिलेविरुद्ध एमआयडीसी पोलीस ठाण्यात अनैतिक मानवी व्यापार कायदा १९५६ चे कलम ३,४,५ व ६ सह भां. द. वि. वि. ३७० अ (२) अन्वये गुन्हा नोंदला आहे. गुन्ह्याचा तपास पोलीस निरीक्षक महादेव राऊत करीत आहेत. पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत बेकायदेशीरपणे चालणाऱ्या कुंटणखान्यावर अशाच पद्धतीने यापुढेही कारवाई करण्यात येणार आहे. सर्व प्रकारचे कुंटणखाने बंद करण्यात येतील. - महादेव राऊत, पोलीस निरीक्षक, अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्ष, सोलापूर

टॅग्स :SolapurसोलापूरCrime Newsगुन्हेगारी