मंगळवेढ्यात वेश्या व्यवसाय सुरू असलेल्या घरावर छापा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2021 04:22 IST2021-03-27T04:22:50+5:302021-03-27T04:22:50+5:30
याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, शोभा संजू ऊर्फ संजय खंदारे हिने शिंदेमळा मार्केट यार्ड, सांगली व जयभवानीनगर गली ...

मंगळवेढ्यात वेश्या व्यवसाय सुरू असलेल्या घरावर छापा
याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, शोभा संजू ऊर्फ संजय खंदारे हिने शिंदेमळा मार्केट यार्ड, सांगली व जयभवानीनगर गली नं. ५ औरंगाबाद येथून उचेठाण (ता. मंगळवेढा) शिवारातील दामाजी साखर कारखाना चौकाच्या
पूर्व बाजूस असणाऱ्या पत्र्याच्या घरात कुंटणखाण्याप्रमाणे वापर करून दोन महिलांना पैशाचे आमिष दाखवून वेश्या व्यवसाय करण्यास भाग पाडले. यावेळी
सतीश निवृत्ती सुरवसे (रा. नागालँड चौक, पंढरपूर) व आम्ही पाठविलेल्या डमी ग्राहकाकडून एक हजार रुपये घेऊन त्यातील २५० रुपये सदर महिलेस देऊन बाकी ७५० रुपये हे स्वत:च्या फायद्यासाठी ठेवून घेतले.
सदर महिलेची शारीरिक पिळवणूक करून त्यांच्याकडून वेश्या व्यवसाय करवून घेऊन त्यांच्या कमाईवर स्वत:ची उपजीविका करताना मिळून आले. यामुळे त्यांच्याविरुद्ध अनैतिक मानवी व्यापार प्रतिबंध अधिनियम सन १९५६ चे कलम ३,४,५ प्रमाणे सरकारतर्फे कायदेशीर फिर्याद पोलीस उपनिरीक्षक प्रणोती यादव यांनी दिली आहे.
सदरची कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी राजश्री पाटील, पोलीस निरीक्षक ज्योतिराम गुंजवटे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक प्रणोती यादव, पोलीस हेड कॉन्स्टेबल अविनाश पाटील, पोलीस कॉन्स्टेबल सचिन बनकर, कैलास खटकाळे, खंडाप्पा हत्ताळे, महिला पोलीस कॉन्स्टेबल सोनाली सावंत, चालक प्रकाश नलवडे यांनी केली.