मंगेवाडीत जुगार अड्ड्यावर धाडीत सव्वालाखांचा ऐवज जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2021 04:18 IST2021-06-02T04:18:05+5:302021-06-02T04:18:05+5:30

सांगोला : गस्त घालणाऱ्या पथकाने सांगोला तालुक्यात मंगेवाडी येथे जुगार अड्ड्यावर धाड टाकून १ लाख २६,९४० रुपयांचा ऐवज जप्त ...

In a raid on a gambling den in Mangewadi, the loot of Savvalakha was seized | मंगेवाडीत जुगार अड्ड्यावर धाडीत सव्वालाखांचा ऐवज जप्त

मंगेवाडीत जुगार अड्ड्यावर धाडीत सव्वालाखांचा ऐवज जप्त

सांगोला : गस्त घालणाऱ्या पथकाने सांगोला तालुक्यात मंगेवाडी येथे जुगार अड्ड्यावर धाड टाकून १ लाख २६,९४० रुपयांचा ऐवज जप्त केला. या कारवाईदरम्यान जुगार खेळणाऱ्यांनी सर्व साहित्य आणि पत्ते जागेवर सोडून पळ काढला. या कारवाईत पोलिसांनी सात दुचाकीही जप्त केल्या आहेत.

३१ मे रोजी दुपारी ३:३० च्या सुमारास हटकर मंगेवाडी स्मशानभूमीजवळ पोलिसांनी कारवाई केली. सहायक पोलीस निरीक्षक प्रशांत हुले, पोलीस नाईक विजय थिटे, पोलीस काॅन्स्टेबल कोळेकर यांच्या गस्ती पथकाने कारवाई केली. अप्पा शिवाजी भुसनर, पोपट रामा भुसनर, सागर बापू खांडेकर, रामचंद्र म्हसा भुसनर, विठ्ठल गणपत हातेकर, महादेव बाबा भुसनर, काकासो दिगंबर भुसनर (सर्वजण रा. हटकर मंगेवाडी) व इतर चौघे जण हे एकत्रित गोलाकार बसून मन्ना नावाचा जुगार खेळत होते. पोलिसांना पाहताच रोख रक्कम, दुचाकी, जुगार साहित्य जागेवर सोडून पळून गेले. याबाबत पोलीस नाईक विजय थिटे यांनी सात जणांविरुद्ध फिर्याद दिली आहे.

Web Title: In a raid on a gambling den in Mangewadi, the loot of Savvalakha was seized