कुंभेजमध्ये जुगार अड्ड्यावर धाड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 1, 2021 04:16 IST2021-07-01T04:16:14+5:302021-07-01T04:16:14+5:30
करमाळा : तालुक्यात कुंभेज गावातील जुगार अड्ड्यावर करमाळा पोलिसांच्या पथकाने धाड टाकून चौघांना अटक केली. त्यांच्याकडून एक लाख दोन ...

कुंभेजमध्ये जुगार अड्ड्यावर धाड
करमाळा : तालुक्यात कुंभेज गावातील जुगार अड्ड्यावर करमाळा पोलिसांच्या पथकाने धाड टाकून चौघांना अटक केली. त्यांच्याकडून एक लाख दोन हजार ४८० रुपयाचा ऐवज पोलिसांनी जप्त केला.
सोमवारी सायंकाळी ६.४५ वाजता पोलिसांनी ही कारवाई केली. याबाबत पोलीस कॉन्स्टेबल शेखर बागल यांनी फिर्याद दिली आहे.
कुंभेज गावातील फॉरेस्ट परिसरात काही लोक जुगार खेळत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. पोलीस उपनिरीक्षक पवार, पोलीस नाईक मरळे, पोलीस कॉन्स्टेबल लवळे यांच्या पथकाने या ठिकाणी धाड टाकून चौघांना मन्ना नावाचा जुगार खेळताना पकडले. या कारवाईत रवींद्र जालिंदर शिंदे, राहुल विठ्ठल शिंदे, सतीश बळीराम चौगुले व समाधान नरहरी पोळ (सर्व रा.कुंभेज) यांना ताब्यात घेतले. या प्रकरणी करमाळा पोलिसांनी या चौघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
---