शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Rain Alert: रेड अलर्ट! महाराष्ट्रातील 'या' जिल्ह्यांना अत्यंत मुसळधार पावसाचा इशारा
2
तुमच्या अनुभवाचा राज्याला काय उपयोग? कुंडमाळा पूल दुर्घटनेवरुन राज ठाकरेंचा सत्ताधाऱ्यांना सवाल
3
Uddhav Thackeray: विधानसभेची चूक पुन्हा करू नका, उद्धव ठाकरेंचा शाखाप्रमुखांना दम!
4
भारताला अडकवण्याचा प्रयत्न करणारा चीनच स्वत:च अडकला, इस्रायलच्या इराणवरील हल्ल्यानं ड्रॅगनलाही फटका
5
तुमचा पैसा तयार ठेवा! 'या' आठवड्यात ६ नवे IPO बाजारात, बंपर कमाईची संधी?
6
Navi Mumbai Suicide: १२ हजार रुपयांत संपूर्ण कुटुंबाचा खर्च चालवायचा कसा? तरुणीने संपवले जीवन
7
Air India Plane Crash: चित्रपट निर्माता बेपत्ता! विमान पडलेल्या ठिकाणाजवळ मोबाइलचं शेवटचं लोकेशन
8
१०-१५ हजारांत संसाराचा गाडा हाकायचा कसा? राज्यातील शिक्षणसेवकांचा सवाल
9
₹१७०० घेऊन गाझियाबादवरून अमेरिकेला पोहोचले; आज झुकरबर्ग, सुंदर पिचाईंपेक्षाही अधिक आहे सॅलरी
10
विशेष लेख: हवाई सुरक्षेबाबत भारत इतका मागास का?
11
तेजीसह शेअर बाजाराच्या कामकाजाला सुरुवात, Sensex ८१,१०० च्या वर; Nifty मध्येही तेजी, 'हे' स्टॉक्स वधारले
12
Ashish Shelar: गणेशोत्सव बंद होऊ देणार नाही, आशिष शेलार यांची ग्वाही; कोर्टात ३० जूनपर्यंत बाजू मांडणार!
13
लॅम्बोर्गिनी चलायी जाने हो...; राम कपूरने घरी आणली लक्झरियस कार, कोटींमध्ये आहे किंमत
14
लाईक्स आणि फॉलोअर्ससाठी आम्हाला त्रास का देता? विमानातल्या व्हायरल फोटोशी इन्फ्लुएन्सरकडून छेडछाड, कुटुंबियांचा संताप
15
Sharad Pawar: आगामी निवडणुकीत युतीबाबतचा निर्णय स्थानिक पातळीवर घेणार- शरद पवार
16
आजचा अग्रलेख: मध्य पूर्वेत पुन्हा आगडोंब!
17
मलायका अरोरा आणि अर्जुन कपूरचं झालं पॅचअप? या पोस्टनंतर चर्चेला उधाण
18
तुलाच पत्नी बनवेन! तरुणाने मृत प्रेयसीसोबत लग्न करून पूर्ण केलं वचन, नातेवाईक भावूक  
19
Matheran: माथेरानमधील तलावात नवी मुंबईचे तिघे बुडाले, एकाला वाचवण्यासाठी दोघांनी घेतल्या उड्या
20
आजचे राशीभविष्य - १६ जून २०२५, लाभदायी दिवस, व्यापार, व्यवसायात अपेक्षित यश मिळण्याची शक्यता

राहुल गांधी यांची सोलापुरात सभा, जागेची पाहणी सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2019 14:26 IST

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वरचष्म्याला शह देण्यासाठी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष, खासदार राहुल गांधी यांची जाहीर सभा पार्क ...

ठळक मुद्दे१३ फेब्रुवारी रोजी मुंबई व भिवंडी दौºयातून सोलापूरच्या सभेला किती वेळ मिळू शकतो याची चाचपणीशहर, जिल्हा काँग्रेस कमिटीचे पदाधिकारी मात्र सभेच्या तयारीला लागले आहेत आता कार्यकर्त्यांकडून सभेसाठी इंदिरा गांधी पार्क स्टेडियमच पर्याय होऊ शकतो असा आग्रह धरला

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वरचष्म्याला शह देण्यासाठी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष, खासदार राहुल गांधी यांची जाहीर सभा पार्क स्टेडियमवरच घ्यावी असा आग्रह काँग्रेस कार्यकर्त्यांमधून सुरू झाला आहे. त्यामुळे हा पाचवा पर्याय निश्चित केला जाण्याची शक्यता सूत्राने व्यक्त केली. 

प्रदेश काँग्रेस कमिटीकडून सोमवारी राहुल गांधी यांच्या दौºयाबाबत स्पष्टीकरण देण्यात आलेले नाही. प्रदेशाध्यक्ष, खासदार अशोक चव्हाण व माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे हे दौरा निश्चित करण्यासाठी आज दिल्लीत तळ ठोकून होते. भिवंडी व मुंबईतील कार्यक्रमातून सोलापूरच्या सभेला कितपत वेळ मिळेल याबाबत चाचपणी करण्यात आली. त्यामुळे सोलापूर दौºयाचे वेळापत्रक सांगण्यात आलेले नाही.

यापूर्वी प्रदेश कमिटीच्या सूचनेप्रमाणे शहर, जिल्हा काँग्रेस कमिटीचे पदाधिकारी मात्र सभेच्या तयारीला लागले आहेत. प्रारंभी सभेसाठी तीन ठिकाणे पाहण्यात आली होती. चौथ्यांदा भवानीपेठेतील जय भवानी प्रशालेचे मैदान सुचविण्यात आले होते. पण आता कार्यकर्त्यांकडून   सभेसाठी इंदिरा गांधी पार्क स्टेडियमच पर्याय होऊ शकतो असा आग्रह धरला आहे. पंतप्रधानांनी ९ जानेवारी रोजी याच ठिकाणी घोषणाबाजी केली होती. त्या गर्दीला उत्तर देण्यासाठी याच ठिकाणी सभा घ्यावी असे मत अनेकांनी पदाधिकाºयांसमोर व्यक्त केले आहे. त्यामुळे प्रदेश कमिटीकडून दौरा निश्चित झाल्यावर सभेसाठी या पाचव्या    पर्यायाचा विचार केला जाणार असल्याचे सांगण्यात आले. 

दौºयाबाबत साशंकता- राहुल गांधी यांचा दौरा सोमवारी जाहीर होणार होता. पण रात्री उशिरापर्यंत प्रदेश कमिटीकडून कोणताच निरोप आलेला नव्हता. प्रदेशाध्यक्षासह माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे दिल्लीत तळ ठोकून होते. पण निरोप न मिळाल्याने दौºयाबाबत काँग्रेस कार्यकर्ते साशंक झाले आहेत. १३ फेब्रुवारी रोजी मुंबई व भिवंडी दौºयातून सोलापूरच्या सभेला किती वेळ मिळू शकतो याची चाचपणी सुरू असल्याचे सूत्राने सांगितले. 

टॅग्स :SolapurसोलापूरRahul Gandhiराहुल गांधीcongressकाँग्रेसSushilkumar Shindeसुशीलकुमार शिंदेNarendra Modiनरेंद्र मोदी