पत्र्यावर पावडर टाकण्यावरून चार जणांविरुद्ध जातीवाचक गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 10, 2021 04:16 IST2021-07-10T04:16:26+5:302021-07-10T04:16:26+5:30

अधिक माहिती अशी की, फिर्यादी अण्णाप्पा सोनकांबळे यांनी ७ जुलै रोजी दुपारी १ वाजता घरासमोर थांबले असता, शेजारील फातिमा ...

Racial offense against four persons for throwing powder on leaves | पत्र्यावर पावडर टाकण्यावरून चार जणांविरुद्ध जातीवाचक गुन्हा

पत्र्यावर पावडर टाकण्यावरून चार जणांविरुद्ध जातीवाचक गुन्हा

अधिक माहिती अशी की, फिर्यादी अण्णाप्पा सोनकांबळे यांनी ७ जुलै रोजी दुपारी १ वाजता घरासमोर थांबले असता, शेजारील फातिमा या महिलेने घराच्या पत्र्यावर पांढऱ्या रंगाची पावडर टाकली, म्हणून विचारले असता, काही नाही, असे म्हणत शिवीगाळ करून निघून गेले. या घटनेची माहिती फिर्यादीने संध्याकाळी आई गीताबाई शेतातून घरी आल्यानंतर सांगितली. तेव्हा मोठ्याने वादविवाद झाला. त्यावेळी गावातील लोकांनी दोघांना समजावून सांगितले, त्यामुळे प्रकरण शांत झाले. पुन्हा शुक्रवारी ९ जुलै रोजी सकाळी साडेआठ वाजता फिर्यादीचे कुटुंब देवकार्यासाठी हैद्रा येथे जात होते, तेव्हा सोहेल पटेल, रफिक पठाण, ताराबाई पटेल, फातिमा पठाण (सर्व रा.गौडगाव) यांनी फिर्यादी व त्यांच्या कुटुंबीयांना लाकडी दांडके, कुऱ्हाड, खुरप्याच्या साहाय्याने मारहाण करून जखमी केले, तसेच जातीवाचक शिवीगाळ, दमदाटी केल्याची तक्रार नोंदवली आहे. यावरून पोलिसांनी ॲट्रॉसिटीचा गुन्हा नोंदला आहे.

Web Title: Racial offense against four persons for throwing powder on leaves