दहिगाव उपसा सिंचनचे रबी आवर्तन सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 06:44 IST2021-02-05T06:44:55+5:302021-02-05T06:44:55+5:30

Inbox NASIR KABIR AttachmentsWed, Jan 27, 7:43 PM (1 day ago) करमाळा : तालुक्याच्या पूर्व भागाला वरदान ठरणाऱ्या दहिगाव ...

Rabi cycle of Dahigaon Upsa Irrigation started | दहिगाव उपसा सिंचनचे रबी आवर्तन सुरू

दहिगाव उपसा सिंचनचे रबी आवर्तन सुरू

Inbox

NASIR KABIR

AttachmentsWed, Jan 27, 7:43 PM (1 day ago)

करमाळा : तालुक्याच्या पूर्व भागाला वरदान ठरणाऱ्या दहिगाव उपसा सिंचन योजनेचे रबी आवर्तन बुधवारपासून सुरू झाले. आ. संजयमामा शिंदे यांच्या पाठपुराव्यामुळे हे काम सुरू झाले.

ऑक्टोबरमध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे कुंभेज याठिकाणी कॅनॉलचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते. या कॅनॉलची तत्काळ दुरुस्ती करून घेतली. तसेच योजनेचे थकीत वीज बिल ५१ लाख ३२ हजार कृष्णा खोरे महामंडळाला भरण्यास आ. शिंदे यांनी भाग पाडले. त्यामुळे रबी आवर्तन वेळेवर सुरू होऊ शकले.

बुधवारी दहिगाव येथील फक्त दोन पंप सुरू करण्यात आले. कुंभेज येथील कॅनाॅल दुरुस्तीच्या ठिकाणी पाण्याची गळती पाहून त्यानुसार उर्वरित पंप चालू करून योजना शंभर टक्के क्षमतेने चालवली जाईल. मुख्य कॅनॉलच्या शेवटच्या टप्प्यात निंभोरे, घोटी या भागात गेट बसविण्याची कामे सुरू असल्यामुळे या आवर्तनाचे पाणी सुरुवातीला वरच्या भागात दिले जाईल. त्यानंतर टेलची कामे पूर्ण झाल्यावर त्या भागात पाणी सोडले जाईल, असे कुकडी डावा कालवा उपविभाग क्रमांक बाराचे उपअभियंता सी. ए. पाटील यांनी सांगितले.

----

फोटो : दहिगाव उपसा सिंचन योजनेच्या कुंभेज येथील उद्भवातून पाणी पडत आहे.

Web Title: Rabi cycle of Dahigaon Upsa Irrigation started

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.