डोळ्यात चटणी टाकून धारदार कोयताने वार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2021 04:21 IST2021-02-12T04:21:33+5:302021-02-12T04:21:33+5:30

पंढरपूर : शेतीच्या वादातून डोळ्यात चटणी टाकून धारदार कोयता आणि लोखंडी गजाने प्राणघातक हल्ला चढवला. या हल्ल्यात पित्यासह तिघेजण ...

Put chutney in the eye and strike with a sharp sickle | डोळ्यात चटणी टाकून धारदार कोयताने वार

डोळ्यात चटणी टाकून धारदार कोयताने वार

पंढरपूर : शेतीच्या वादातून डोळ्यात चटणी टाकून धारदार कोयता आणि लोखंडी गजाने प्राणघातक हल्ला चढवला. या हल्ल्यात पित्यासह तिघेजण जखमी झाले.

कौठाळी (ता. पंढरपूर) येथे बुधवारी सकाळी ही घटना घडली. या हल्ल्यात लहान मुलासह तिघे गंभीर जखमी झाले आहेत. संदीप अनिल पाटील, मुलगा अथर्व पाटील आणि भाऊ नंदकुमार पाटील हे जखमी झाले.

पोलीस सूत्राकडील माहितीनुसार संदीप पाटील यांच्या शेताशेजारी शहाजी हरी पाटील व हरी महादेव पाटील यांची शेती आहे. त्यांचा ऊस संदीप पाटील यांच्या शेतात पडला होता. तो ऊस बाजूला घ्या असे संदीप याने सांगितले. दरम्यान संदीप शेताकडे निघाले होते. शेताच्या शेजारी राहणारे समाधान पाटील, शहाजी पाटील, बालाजी पाटील, सोमनाथ पाटील यांनी येऊन संदीपच्या डोळ्यात चटणी टाकली. समाधान पाटील याने हातातील लोखंडी गजाने संदीप यांच्या नाकावर मारले. शहाजी पाटील याने धारदार कोयत्याने चेहऱ्यावर वार केले. बालाजी पाटील व सोमनाथ पाटील यांनी शिवीगाळ करत लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. आवाज कानी पडताच संदीपचा भाऊ नंदकुमार पाटील, मुलगा अथर्व हे भांडण सोडवण्यासाठी आले असता शहाजी पाटील याने त्यांच्यावर कोयत्याने वार केले. याबाबत पंढरपूर ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक गोंदे करत आहेत.

Web Title: Put chutney in the eye and strike with a sharp sickle