शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! दिवाळीच्या ताेंडावर वीज दरवाढीचा 'उत्सव'; प्रति युनिट ३५ ते ९५ पैशांपर्यंत बिल वाढणार
2
कोजागरी पौर्णिमा केव्हा साजरी करायची? यंदा मध्यरात्रीच आली, पंचांगकर्ते दा. कृ. सोमण म्हणाले...
3
पैसेच नव्हते, मग दुसऱ्याच्या तुटलेल्या बॅटने खेळलो, जिंकलोही; तिलक वर्माने सांगितला आपला प्रवास
4
सगळे काही मराठा समाजालाच का? ओबीसी नेत्यांचा सवाल, मोर्चावर ठाम
5
आज हायव्होल्टेज लढत! भारत-पाकिस्तान महिला संघ आज भिडणार, हस्तांदोलन करणार? 
6
राज-उद्धव एकत्र आल्याने काही फरक पडणार नाही : गृहराज्यमंत्री योगेश कदम
7
रोहित शर्माची उचलबांगडी, ऑस्ट्रेलिया दौऱ्यात शुभमन गिलकडे नेतृत्व; विराटसह संघात ठेवले हेच...
8
‘त्या’ कफ सिरपच्या नमुन्यांत भेसळ; उत्पादन, विक्री थांबवण्याचे आदेश
9
पाकव्याप्त काश्मीरमध्ये आंदोलन, शरीफ नरमले; आंदोलन मागेही घेतले
10
५० हजारांना मुलीची खरेदी; जबरीने लग्न
11
ईएमआय की एसआयपी? तुम्हाला कोण करेल श्रीमंत?
12
कफ सिरपने जीव घेणारी यंत्रणाच ‘विषारी’
13
बांबू मेंटॅलिटी असेल तर यश तुमचेच आहे...
14
परीक्षेचा अटॅक: ताण, चिंता इतकी वाढते की ज्यामुळे अभ्यासात लक्ष लागत नाही
15
अमेरिकेत भारतीय विद्यार्थ्याची गोळ्या घालून हत्या; शिक्षणासोबत पेट्रोल पंपावर करत होता पार्ट-टाईम काम
16
“राहुल गांधी यांचा पासपोर्ट जप्त करावा अन् कायदेशीर कारवाई करावी”; भाजपा नेत्यांची मागणी
17
रोहित शर्माने कप्तानी सोडली की त्याला हटवलं? निवड समिती अध्यक्ष अजित आगरकरांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले...
18
निसर्ग अशांतच! अतिवृष्टीनंतर आता ‘शक्ती’ चक्रीवादळाचा धोका; किनारपट्टी भागात सतर्कतेचा इशारा
19
वनडे क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात यशस्वी कर्णधार; रोहित शर्मा दुसरा, मग पहिला कोण?
20
फर्रुखाबादमधील कोचिंग सेंटरमध्ये भीषण स्फोट; एकाचा मृत्यू, सहा जण जखमी

बारामतीला धक्का; अकलूजचं ‘समाधान’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 31, 2019 16:33 IST

काँग्रेस, राष्ट्रवादीचे नेते एकत्र येऊनही सोलापूर झेडपीत ‘समविचारी’ गटाचा अध्यक्ष अन् उपाध्यक्ष

ठळक मुद्दे- जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्षपदाच्या निवडीनंतर जिल्हा परिषद आवारात जल्लोष- जिल्हा परिषदेच्या पदाधिकारी निवडीनंतर जिल्'ातील राजकीय घडामोडींना आला वेग- पोलीस बंदोबस्तात पार पडली निवडणूक; संदीप जाधव यांनी पार पाडली निवडणूक अधिकाºयाची भूमिका

सोलापूर : जिल्हा परिषद अध्यक्षपदी भाजप पुरस्कृत समविचारी आघाडीचे अनिरूध्द कांबळे याची तर उपाध्यक्षपदी आवताडे गटाचे दिलीप चव्हाण यांची निवड झाल्याची घोषणा निवडणूक निर्णय अधिकारी तथा अप्पर जिल्हाधिकारी संदीप जाधव यांनी केली. या निवडणूकीत राष्ट्रवादी अन् काँग्रेसची दिग्गज नेते मंडळी एकत्र येऊनही मोहिते-पाटील गटानं ‘दे धक्का’ दिला. अध्यक्ष व उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीत समाधान आवताडे गटाची साथ मिळाल्यानं ‘बारामतीला धक्का’ बसला तर समविचारी गटाचं ‘समाधान’ झालं.मंगळवारी सोलापूर जिल्हा परिषदेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात सोलापूर जिल्हा परिषद अध्यक्ष व उपाध्यक्षपदाची निवडणूक पार पडली़ यावेळी भाजप पुरस्कृत समविचारी गटाच्या बाजूने अध्यक्षपदासाठी मोहिते-पाटील गटाचे अनिरूध्द कांबळे (केम ता. करमाळा ) तर महाविकास आघाडीकडून त्रिभुवन धार्इंजे (वेळापूर, ता़ माळशिरस) यांच्यात लढत झाली. यावेळी कांबळे यांना ३७ तर धार्इंजे यांना २९ मते मिळाली़. उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीत समविचारीकडून आवताडे गटाचे दिलीप चव्हाण व महाविकास आघाडीकडून विक्रांत पाटील (बाळराजे) यांच्यात लढत झाली. यात चव्हाण यांना ३५ तर बाळराजे यांना ३१ मते मिळाली. अशाप्रकारे उपाध्यक्षपदी समविचारी गटाचे दिलीप चव्हाण विजयी झाले. अशाप्रकारे जिल्हा परिषदेवर भाजप पुरस्कृत समविचार आघाडीचा पुन्हा एकदा झेंडा फडकला आहे. या निवडीनंतर जिल्हा परिषद परिषद परिसरात जल्लोष करण्यात आला.  काँग्रेसचे मल्लिकार्जुन पाटील हे समविचारी आघाडीच्या बाजुने होते़ आता उपाध्यक्षपदासाठी निवडणूक सुरू आहे.

प्रारंभी अध्यक्षपदाची निवडणूक सुरू झाल्यानंतर जिल्हा परिषदेचे सदस्य उमेश पाटील यांनी सदस्यांना व्हिप बजाविण्यास परवानगी द्यावी अशी विनंती निवडणुक निर्णय अधिकाºयाकडे केली होती़ यावेळी भाजपच्या सदस्यांनी या विनंती मागणीला विरोध केला़ तत्पुर्वी निवडणुक निर्णय अधिकाºयानी कायद्यात तशी तरतूद नाही असे सांगून राष्ट्रवादीची विनंती फेटाळली. 

टॅग्स :SolapurसोलापूरSolapur Zilla Parishadसोलापूर जिल्हा परिषदElectionनिवडणूकPoliticsराजकारण