शहरं
Join us  
Trending Stories
1
झेलेन्स्की यांना बोलावले, पुतिन यांच्याशीही पुन्हा चर्चा करणार; अलास्का बैठकीनंतर डोनाल्ड ट्रम्प यांची नवी तयारी
2
Trump Putin: डोनाल्ड ट्रम्प यांनी पुतीन यांना दिलं पत्नी मेलानिया यांचं पत्र; 'त्या' पत्रात काय लिहिलंय?
3
५ हजारांपासून ४० हजार कोटींपर्यंतचा प्रवास: 'बिग बुल' राकेश झुनझुनवालांना उगाचचं नाही म्हणत दलाल स्ट्रीटचे जादूगार
4
आता स्टील आणि सेमीकंडक्टरवरही टॅरिफ लावणार ट्रम्प? अमेरिकन राष्ट्राध्यक्षांचं उत्तर ऐकून वाढेल संपूर्ण जगाचं टेन्शन!
5
'विरोधकांची विकास विरोधी हंडी जनतेने फोडली'; उपमुख्यमंत्री शिंदेंचा महाविकास आघाडीवर हल्ला
6
‘बंगाल फाइल्स’चा ट्रेलर लॉन्च होताच कोलकात्यात वाद, बोलवावे लागले पोलीस, विवेक अग्निहोत्री म्हणाले...  
7
Shravan Somvar 2025: इच्छित मनोकामनापूर्तीसाठी शेवटच्या श्रावणी सोमवारी चुकवू नका 'हा' उपाय!
8
'वाळवा तालुका स्वाभिमानी, सहजासहजी वाकत नाही, लढाई शेवटपर्यंत...', जयंत पाटलांचा अजितदादांसमोर टोला
9
NCERT: भारताच्या फाळणीला तीन नेते जबाबदार; एनसीआरटीच्या पुस्तकात कुणाची नावे?
10
HDFC Bank च्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी; कॅश पासून फ्री चेकबुकपर्यंतचे नियम बदलले, जाणून घ्या
11
दहीहंडी २०२५: पहिला १० थरांचा विश्वविक्रम; जोगेश्वरीच्या कोकण नगर गोविंदा पथकाचा पराक्रम
12
गणेशोत्सव २०२५: यंदा श्रीगणेश चतुर्थीचा शुभ मुहूर्त कधी? पाहा, महत्त्व अन् काही मान्यता
13
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा GST रिफॉर्म; दूध, दही, टीव्ही, सायकल सर्वकाही स्वस्त होणार?
14
“गुजरातींकडे नाही, मुंबई मराठी माणसाकडेच राहिली पाहिजे, हे ठाकरे बंधूंचे टार्गेट”: संजय राऊत
15
तुम्हाला माहित्येय? बाइक अथवा कारमागे का धावतात कुत्रे? जाणून घ्या, होईल फायदा...!
16
प्रेमात पडले, लग्न केलं, पण आता गायब झाली पत्नी, प्रेमविवाह ठरला रहस्य, नेमका प्रकार काय?  
17
५० टक्के ट्रम्प टॅरिफवर RSS नेते थेट बोलले; म्हणाले, “राष्ट्रहित समोर ठेवून भारताचे निर्णय”
18
"देशाचे स्वातंत्र्य हे असंख्य क्रांतिकारकांच्या त्यागाचे, बलिदानाचे आणि संघर्षाचे फळ"; CM योगींनी आपल्या निवासस्थानी फडकावला तिरंगा
19
Asia Cup 2025 : संजू अन् रिंकू आउट! आशिया कपसाठी भज्जीनं दिली केएल राहुलसह रियानला पसंती
20
Gopal Kala 2025: देवकीने जन्म दिला, तरी मातृसौख्य यशोदेला; कोणत्या हिशोबाची कृष्णाने केली परतफेड?

नोटाबंदीच्या नावाखाली कोट्यवधी रुपये कमविण्याचा हेतू : प्रकाश आंबेडकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 30, 2019 10:38 IST

सोलापूरमध्ये १२०० कोटींचा कोळशाचा प्रकल्प आणून जनतेला फसविण्याचे काम केले आहे - प्रकाश आंबेडकर

ठळक मुद्देनरेंद्र मोदी यांनी मीपणा दाखवण्याच्या नादात आपले सिक्रेट जगासमोर आणले - प्रकाश आंबेडकर काळ्या पैशाचे भूत जनतेसमोर आणले. या भीतीपोटी लोकांनी कमिशन देऊन नोटा बदलून घेतल्या - प्रकाश आंबेडकर

मंगळवेढा : नोटाबंदीच्या नावाखाली नोटा बदलण्याच्या पाठीमागे दोन दिवसात कोट्यवधी रुपये कमवायचा हेतू होता, म्हणून काळ्या पैशाचे भूत जनतेसमोर आणले. या भीतीपोटी लोकांनी कमिशन देऊन नोटा बदलून घेतल्या. ४०-६० चा रेषो होता. हा ४० टक्क्यांचा निधी आता निवडणुकीत वापरला जाऊन पुन्हा सत्ता घेण्याचा प्रयत्न होणार आहे, अशी टीका प्रकाश आंबेडकर यांनी मोदींवर केली.

मंगळवेढा येथे आयोजित जाहीर सभेत ते बोलत होते़ व्यासपीठावर लक्ष्मण गायकवाड, इसार शेख, अण्णाराव पाटील, माऊली हळणकर, विकास दुधाळ, महादेव ढोणे, अशोक माने, सोमनाथ ढावरे, सुनील शिंदे, वैशाली सावंत, उषा चव्हाण, निकिता सोनवणे, लक्ष्मी ससाणे, अंकुश शेवडे, विकास दुधाळ, नितीन साळवे, महेश कांबळे आदी उपस्थित होते.

प्रकाश आंबेडकर म्हणाले, नरेंद्र मोदी यांनी मीपणा दाखवण्याच्या नादात आपले सिक्रेट जगासमोर आणले. साºया गुप्ततेचा भंग केला. शस्त्रे ही जपून ठेवायची असतात. संकटाच्या काळात त्याचा वापर केला तर शत्रूवर अधिक परिणाम होतो. सैन्यबल व शस्त्रबल अधिक असल्यामुळे आपण पुढे होतो. आपली शस्त्रे बाहेर काढल्याने पाकिस्तानवर आपले असलेले वर्चस्व सरकारने घालवल्याची टीका त्यांनी केली.

सोलापूरमध्ये १२०० कोटींचा कोळशाचा प्रकल्प आणून जनतेला फसविण्याचे काम केले आहे़ हा प्रकल्प आणणाºया व्यक्तीला मी महामूर्ख म्हणतो़ राज्यात व देशामध्ये एक-दोन लोकप्रतिनिधी निवडून येऊन उपयोग नाही, यांची सत्ता मुळासकट उपटली पाहिजे, असे प्रकाश आंबेडकर यांनी सांगितले.

टॅग्स :SolapurसोलापूरLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकsolapur-pcसोलापूरPrakash Ambedkarप्रकाश आंबेडकरNarendra Modiनरेंद्र मोदीNote Banनोटाबंदी