शहरं
Join us  
Trending Stories
1
PM Narendra Modi : मोदी 3.0! नरेंद्र मोदींनी तिसऱ्यांदा घेतली पंतप्रधानपदाची शपथ...
2
T20 World Cup 2024 IND vs PAK Live Match : पाऊस थांबला, खेळपट्टीची पाहणी झाली! सामन्याची वेळ अन् किती षटकांची मॅच तेही ठरलं
3
PM Modi Oath-Taking Ceremony Live: नरेंद्र मोदींनी तिसऱ्यांदा PM पदाची घेतली शपथ; ६९ खासदार घेणार मंत्रिपदाची शपथ
4
चारवेळा मुख्यमंत्री, सहाव्यांदा खासदार; केंद्रात पहिल्यांदाच मंत्री झाले शिवराज सिंह चौहान
5
"आम्ही वाट पाहायला तयार"; अजित पवारांनी सांगितले मंत्रिपद नाकारण्याचे कारण
6
गुजरात ६, बिहार ८, यूपी ९, महाराष्ट्र...; जाणून घ्या, कोणत्या राज्यातून कुठल्या नेत्याची लागूशकते मंत्रीपदी वर्णी?
7
NCP : राष्ट्रवादीला केंद्रीय मंत्रिमंडळात मंत्रिपद का नाही? प्रफुल्ल पटेल यांनी सगळंच सांगितलं
8
नारायण राणे, स्मृती इराणी, अन्...; या कॅबिनेटमध्ये दिसणार नाहीत मोदी सरकार 2.0 मधील हे 20 दिग्गज चेहरे?
9
एकाचे वय 36 तर दुसऱ्याकडे 5000 कोटींची संपत्ती; केंद्रात TDP च्या 'या' दोन खासदारांना संधी
10
व्हीके पांडियन यांची राजकारणातून निवृत्ती; नवीन पटनायक आणि BJD ची मागितली माफी...
11
30 हजार पॅलेस्टाईन समर्थकांचा व्हाईट हाऊसला घेराव, जो बायडन यांच्या विरोधात निदर्शने
12
HDFC बँक ग्राहकांसाठी खुशखबर! EMI चा बोजा कमी होणार; वाचा बँकेचं प्लॅनिंग
13
'मातोश्री'कडून आमदार भास्कर जाधवांवर सोपवली मोठी जबाबदारी
14
Srishti Jain : "कोणाला उचलून घेऊन आलात?"; अभिनेत्री ढसाढसा रडली, सर्वांसमोर झालेला अपमान
15
'2047 पर्यंत भारत विकसित देश बनणार...' शपथविधीपूर्वी नरेंद्र मोदींची संभाव्य मंत्र्यांसोबत बैठक
16
'तारक मेहता..'मधली नवी 'सोनू' बोल्डनेसमध्ये भिडे मास्तरांच्या जुन्या सोनूलाही देतेय टक्कर
17
चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ ची संभाव्य तारीख आली समोर! पण, मोदी सरकारमुळे पाकिस्तानची कोंडी 
18
"सगळ्यात जास्त फायदा प्रफुल्ल पटेलांना"; मंत्रिपदावरुन अजितदादांबाबत रोहित पवारांचा मोठा दावा
19
पंकजा मुंडे यांचा पराभव जिव्हारी, ऊसतोड कामगार युवकाने संपवले जीवन
20
Sunita Rajwar : "मी खूप संघर्ष केला, आई-वडिलांनी..."; ट्रक ड्रायव्हरची मुलगी बनली लोकप्रिय अभिनेत्री

सोलापूर जिल्ह्यात पाच ठिकाणी हमीभाव केंद्र सुरू, आतापर्यंत १२४१ क्विंटल उडिदाची खरेदी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 07, 2017 12:59 PM

जिल्ह्यात पाच ठिकाणी हमीभाव केंद्र सुरू होणार असले तरी प्रत्यक्षात कुर्डूवाडीचेच केंद्र सुरू झाले असून, या केंद्रावर १८५ शेतकºयांच्या १२४१ क्विंटल उडिदाची विक्री झाली आहे.

ठळक मुद्देपाच केंद्रांवर ३५७१ शेतकºयांनी आॅनलाईन नोंदणी केली केंद्रावर खरेदी करण्यासाठी शेतकºयांना आॅनलाईन नोंदणी करण्याचे बंधनकारक ११ ठिकाणी मका खरेदी केंद्रे

आॅनलाइन लोकमत सोलापूरसोलापूर दि ७ : जिल्ह्यात पाच ठिकाणी हमीभाव केंद्र सुरू होणार असले तरी प्रत्यक्षात कुर्डूवाडीचेच केंद्र सुरू झाले असून, या केंद्रावर १८५ शेतकºयांच्या १२४१ क्विंटल उडिदाची विक्री झाली आहे. पाच केंद्रांवर ३५७१ शेतकºयांनी आॅनलाईन नोंदणी केली असल्याचे सांगण्यात आले.यावर्षी खरिपातील सोयाबिन, मूग, उडिदाची हमीभाव केंद्रावर खरेदी करण्यासाठी शेतकºयांना आॅनलाईन नोंदणी करण्याचे बंधनकारक केले आहे़ सोलापूर जिल्ह्यात कुर्डूवाडी, बार्शी, सोलापूर, दुधनी व अक्कलकोट येथे हमीभाव केंद्र सुरू करण्यात येणार आहेत. या केंद्रावर उडीद, सोयाबिन व मुगाची आॅनलाईन नोंदणी करण्याचे आवाहन केल्यानंतर कुर्डूवाडी केंद्रावर सर्वाधिक दोन हजार १९ शेतकºयांनी नोंदणी केली. सोलापूर केंद्रावर १४६, अक्कलकोट १२१, दुधनी ६१ तर बार्शी केंद्रावर १२२४ शेतकºयांनी नोंदणी केली आहे. बार्शी केंद्रावर नोंदणी केलेल्यांमध्ये १५० शेतकºयांनी सोयाबिनची नोंद केली आहे. नोंदणी केलेल्यांपैकी केवळ कुर्डूवाडी केंद्रावर १८५ शेतकºयांच्या १२४१ क्विंटलची विक्री झाली   आहे. अन्य हमीभाव केंद्रांपैकी बार्शी व दुधनी केंद्र सुरू  करण्यात आले असले तरी प्रत्यक्षात धान्याची विक्री झालेली नाही. दुधनी केंद्रावर धान्य आणण्यासाठी शेतकºयांना मोबाईलवर एसएमएस पाठविला असला तरी शेतकºयांचा प्रतिसाद मिळत नसल्याचे सांगण्यात आले. ------------------------११ ठिकाणी मका खरेदी केंद्रेच्जिल्ह्यात करमाळा, बार्शी, अक्कलकोट, कुर्डूवाडी, अनगर, पंढरपूर, नातेपुते, अकलूज, सांगोला, मंगळवेढा व सोलापूर या ठिकाणी मका हमीभाव केंद्र सुरू करण्यासाठी जिल्हाधिकाºयांकडे प्रस्ताव पाठविला असल्याचे सांगण्यात आले. मंजुरी मिळताच मागणीप्रमाणे हमीभावाने मका खरेदीला सुरुवात होईल, असे जिल्हा मार्केटिंग अधिकारी दिलीप पाटील यांनी सांगितले.