पंढरपूरातील चंद्रभागा नदीतील पुंडलिक मंदिर पाण्यात
By Admin | Updated: August 5, 2016 19:15 IST2016-08-05T19:15:03+5:302016-08-05T19:15:03+5:30
पंढरपूर आणि सोलापूरात मुसळधार पाउस नसला तरी सातार्यातील मुसळधार पावसाने नीरा नदी दुथडी भरुन वाहत आहे त्यामुळे नीरेवरील वीर धरणातून मोठा विसर्ग सोडण्यात आला

पंढरपूरातील चंद्रभागा नदीतील पुंडलिक मंदिर पाण्यात
ऑनलाइन लोकमत
पंढरपूर, दि. ५ : पंढरपूर आणि सोलापूरात मुसळधार पाउस नसला तरी सातार्यातील मुसळधार पावसाने नीरा नदी दुथडी भरुन वाहत आहे त्यामुळे नीरेवरील वीर धरणातून मोठा विसर्ग सोडण्यात आला. त्यामुळे नीरेतील पाणी वाढले. नीरा नरसिंगपूर येथे नीरा- भीमेचा संगल असल्याने भीमेत नीरा नरसिंग पूर पासून प्रचंड पाणी यायला लागले. त्यामुळे उजनी धरण अद्याप रमायनस मध्ये असले व भीमेत विसर्ग सोडला नसला तरी उजनीच्या पुढे निरेच्या संगमापासून नरसिंगपूर येथे भीमेच्या पाण्यात मोठी वाढ झाली ते पाणी पंढरपूरात आज पोचले आणि पंढरपूरचा दगडी पूल पाण्याखाली गेल तर पुंडलिकाचे मंदिरही अर्धे पाण्याखाली गेले आहे..