टेंभुर्णीत हायमास्ट दिव्यांचा लोकांचा लोकार्पण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2021 04:33 IST2021-02-23T04:33:33+5:302021-02-23T04:33:33+5:30

टेंभुर्णी: टेंभुर्णी ग्रामपंचायतीच्या वतीने नागरी सुविधा अंतर्गत ३१ लाख रुपये खर्चून उभारण्यात आलेल्या रोड लाईट व हायमास्ट दिव्यांचे लोकार्पण ...

Public offering of high mast lamps at Tembhurni | टेंभुर्णीत हायमास्ट दिव्यांचा लोकांचा लोकार्पण

टेंभुर्णीत हायमास्ट दिव्यांचा लोकांचा लोकार्पण

टेंभुर्णी: टेंभुर्णी ग्रामपंचायतीच्या वतीने नागरी सुविधा अंतर्गत ३१ लाख रुपये खर्चून उभारण्यात आलेल्या रोड लाईट व हायमास्ट दिव्यांचे लोकार्पण सरपंच प्रमोद कुटे यांच्या हस्ते झाले.

नागरी सुविधा योजनेअंतर्गत टेंभुर्णी ग्रामपंचायतीच्या वतीने शहरातील विविध भागातील रोडवर सुमारे ३१ लाख रुपये खर्च करून नवीन खांब उभारून एलईडी दिवे बसविण्यात आले आहेत. कन्हेरगाव रोड, भवानी मंदिर ते नाळे वस्ती रोड, चव्हाण वाडी रोड ,बेंबळे रोड ते शिक्षक सोसायटी रोडवर स्ट्रीट लाईट बसवले आहेत. या स्ट्रीट लाईटचे लोकार्पण सरपंच प्रमोद कुटे यांच्या हस्ते झाले.

याप्रसंगी उपसरपंच धनंजय गोंदिल, वैभव कुटे, गणेश केचे, औंदुंबर महाडीक, अमोल धोत्रे, सोमनाथ साळुंखे ,शैलेश कोहोळ, हरी सटाले, महेंद्र वाकसे, रामभाऊ शिंदे, सुरेश लोंढे, दादा नाळे, प्रशांत सोनवणे, किशोर सोनवणे, अमोल डोईफोडे, अशोक वाघगावकर, हरी सटाले, संदीप लोंढे, संजय कुटे उपस्थित होते.

---

फोटो : २१ टेंभुर्णी

टेंभुर्णी शहरातील स्ट्रीट लाईटचे लोकार्पण करताना सरपंच प्रमोद कुटे

Web Title: Public offering of high mast lamps at Tembhurni