खानापूर रेल्वे पुलाखाली सापडलेला मृतदेह मनोरुग्णाचा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2021 04:22 IST2021-02-13T04:22:26+5:302021-02-13T04:22:26+5:30

अक्कलकोट : खानापूर (ता. अक्कलकोट) येथील रेल्वेपुलाखाली पाण्यात आढळलेल्या बेवारस मृतदेहाची अखेर ओळख पटवण्यात पोलिसांना यश आले आहे. ती ...

Psychiatric body found under Khanapur railway bridge | खानापूर रेल्वे पुलाखाली सापडलेला मृतदेह मनोरुग्णाचा

खानापूर रेल्वे पुलाखाली सापडलेला मृतदेह मनोरुग्णाचा

अक्कलकोट : खानापूर (ता. अक्कलकोट) येथील रेल्वेपुलाखाली पाण्यात आढळलेल्या बेवारस मृतदेहाची अखेर ओळख पटवण्यात पोलिसांना यश आले आहे. ती मृत व्यक्ती विजयपूर (कर्नाटक) येथील अविनाश शिवराम घोरपडे (वय ४०) असून, पोलिसांनी सोशल मीडियातून फिरवलेली त्याची माहिती नातेवाइकांपर्यंत पोहोचली.

याबाबत दक्षिण पोलीस ठाण्याने याची नोंद घेतली आहे.

९ फेब्रुवारी रोजी खानापूर येथील रेल्वे पुलाखाली एका ४० वर्षीय व्यक्तीचा मृतदेह आढळला होता. पाण्याच्या कडेला तो तरंगत होता. याबाबत कोतवाल जगदीश देसाई यांनी अक्कलकोट येथील दक्षिण पोलीस ठाण्यात खबर दिली. ओळख पटत नसल्याने मृताच्या वर्णनाची माहिती सोशल मीडियावर व्हायरल झाली. मृत व्यक्तीचा भाऊ राजू घोरपडे याच्यापर्यंत ही माहिती पोहोचली. त्याने अक्कलकोट दक्षिण पोलीस ठाण्यात धाव घेतली. त्याची ओळख पटताच मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवून देण्यात आला. त्याच्या नातेवाइकांनी पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार तो मनोरुग्ण होता. दवाखान्यातून गोळ्या घेऊन येतो, असे सांगून तो घराबाहेर पडला. त्यानंतर तो परत घरी परतलाच नाही. या शोधकार्यात हवालदार मल्लिनाथ कलशेट्टी, लक्ष्मण कांबळे, वीरभद्र उपासे, संजय पांढरे, सिकंदर मुल्ला यांनी सहभाग नोंदवला. अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक तुकाराम राठोड करीत आहेत.

Web Title: Psychiatric body found under Khanapur railway bridge