करमाळ्यात नितेश राणेचा निषेध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2021 04:22 IST2021-03-18T04:22:10+5:302021-03-18T04:22:10+5:30

करमाळा : सचिन वाझे प्रकरणात भाजपाचे आमदार नितेश राणे यांनी युवा सेनेचे सचिव वरुण सरदेसाई यांच्यावर केलेल्या गलिच्छ आरोपावरुन ...

Protest of Nitesh Rane in Karmala | करमाळ्यात नितेश राणेचा निषेध

करमाळ्यात नितेश राणेचा निषेध

करमाळा : सचिन वाझे प्रकरणात भाजपाचे आमदार नितेश राणे यांनी युवा सेनेचे सचिव वरुण सरदेसाई यांच्यावर केलेल्या गलिच्छ आरोपावरुन करमाळा तालुक्यात पडसाद उमटले.

युवा सेनेचे करमाळा शहरप्रमुख विशाल गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली युवासैनिकांनी नितेश राणे यांच्या प्रतिकात्मक पुतळ्यास जोडे मारुन दहन केले.

या प्रसंगी शिवसेना उपजिल्हाप्रमुख महेश चिवटे, भरत आवताडे, माजी शिवसेना शहरप्रमुख संजय शिलवंत, शंभुराजे फरतडे उपस्थित होते. यावेळी विशाल गायकवाड म्हणाले, राणे यांनी ठाकरे कुटुंब व युवा सेनेच्या नेत्यांवर टिका करण्याऐवजी कोकणातील राजकीय प्रतिष्ठा संभाळण्यासाठी लक्ष द्यावे. या आंदोलनात उपतालुका प्रमुख दादासाहेब तनपुरे, हनुमंत रंदवे, साई फडतरे, सागर गायकवाड, सागर कोकाटे, चक्रधर पाडुळे, नरेंद्र भिंगारे, तुषार नवले, अविनाश भिसे, मयूर यादव, प्रसाद निंबाळकर उपस्थित होते.

---

१७ करमाळा

नितेश राणे च्या प्रतिकात्मक पुतळयास जोडे मारुन निषेध नोंदवताना युवा शिवसैनिक

Web Title: Protest of Nitesh Rane in Karmala