डिकसळ पुलासाठी ५५ कोटींची तरतूद करण्याचे आश्वासन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 16, 2021 04:23 IST2021-02-16T04:23:12+5:302021-02-16T04:23:12+5:30
२०२१-२२ या अर्थसंकल्पाच्या राज्यस्तरीय नियोजन बैठकीमध्ये जिल्हा हद्द-कोंढार चिंचोली- खातगाव ते पोमलवाडी प्रजिमा ३ या रस्त्यावरील पुलाच्या ...

डिकसळ पुलासाठी ५५ कोटींची तरतूद करण्याचे आश्वासन
२०२१-२२ या अर्थसंकल्पाच्या राज्यस्तरीय नियोजन बैठकीमध्ये जिल्हा हद्द-कोंढार चिंचोली- खातगाव ते पोमलवाडी प्रजिमा ३ या रस्त्यावरील पुलाच्या कामासाठी ५५ कोटी रुपयांची मागणी आ. संजयमामा शिंदे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे केली आहे. त्यांनी दिलेल्या निवेदनामध्ये म्हटले आहे, करमाळा तालुक्याच्या सीमेवर डिकसळ असून, दळणवळण सुलभ होण्याच्या दृष्टीने प्रमुख जिल्हा मार्ग क्र. १९० असलेल्या पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुका व अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत तालुका यांना जोडणारा डिकसळचा महत्त्वपूर्ण पूल आहे.
या पुलाचे काम झाल्यास ऊस उत्पादक शेतकरी, शालेय विद्यार्थी, रुग्ण यांना रहदारीचे दृष्टीने सोयीचे होईल. या पुलाचे काम २०२१-२२ या अर्थसंकल्पात समाविष्ट करून निधी उपलब्ध व्हावा, अशी मागणी त्यांनी केली आहे.
याप्रसंगी गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई, पालकमंत्री दत्तात्रय भरणे, आ. संजयमामा शिंदे, उद्धव माळी, सुरेश पालवे व अधिकारी उपस्थित होते.