शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

शहरात येत्या पंधरवड्यात मोर्चा, ४ डिसेंबरपर्यंत अंमल, सभा आंदोलनास मनाई

By विलास जळकोटकर | Updated: November 20, 2023 18:22 IST

शहर पोलीस प्रशासनाने बजावले आदेश

विलास जळकोटकर, सोलापूर: दीपावली पार पडलेली असलीतरी अद्यापही आगामी काळात धार्मिक उत्सव, सणांचा काळ असल्याने या कालावधीमध्ये शहर परिसरात अनुचित प्रकार घडू नये याची खबरदारी घेण्यासाठी पोलिस प्रशासनाकडून सोमवारपासून (दि. २०) येत्या ४ डिसेंबरपर्यंत सभा, मोर्चे, आंदोलने करण्यास मनाई करण्याचा जमावबंदीचा आदेश काढला आहे.

पोलीस उपायुक्त दीपाली काळे यांच्या सहीनिशी या सूचना देण्यात आल्या आहेत. सध्या सर्वत्र सभा, मोर्चे, आरक्षण मागणी अशा विविध घटनांनी समाजातील वातावरण ढवळून निघत आहे. त्यातच आगामी काळात अनेक सण व धार्मिक उत्सव संपन्न होणार असल्याने शहरातील कायदा व सुव्यवस्था बिघडवण्यासाठी अथवा त्यात बाधा आणण्याचे प्रकार घडण्याची दाट शक्यता असल्याचे पोलिस प्रशासनाचे म्हणणे आहे.या आदेशानुसार शहर पोलिस प्रशासनातर्फे महाराष्ट्र पोलिस प्रशासन अधिनियम १९५१ च्या कलम ३७ (१) व ३७ (३) नुसार शहर व परिसरात ज्वालाग्राही पदार्थ वाहून नेणे, दगड अथवा शस्त्रसाठा करणे, व्यक्ती अथवा प्रतिमेचे प्रदर्शन करणे, सार्वजनिक ठिकाणी जोरजोरात गाणी म्हणणे, असभ्य हावभाव करत धार्मिक भावना दुखावणे अशा बाबींसाठी मनाई करण्यात आली आहे.

एकत्र येण्यास बंदी

याबरोबरच सार्वजनिक ठिकाणी सभा घेणे, मोर्चे काढणे, निदर्शने करणे, विरोधदर्शक आंदोलने करणे यासह पाचपेक्षा अधिक लोकांनी एकत्र जमण्यास मनाई करण्यात आली आहे. ज्यांनी पास काढले आहेत अथवा परवानगी काढली आहे अशांना हा आदेश लागू होणार नाही. हा मनाई आदेश ४ डिसेंबरच्या मध्यरात्रीपर्यंत लागू राहणार आहे.

टॅग्स :SolapurसोलापूरPoliceपोलिस