शहरं
Join us  
Trending Stories
1
IND W vs PAK W "म्हारी छोरियां छोरो से कम है के.." हरमनप्रीत ब्रिगेडनंही पाकची जिरवली!
2
'अमेरिकेसोबत काही मुद्दे सोडवायला हवेत', ट्रेड डील आणि टॅरिफबाबत जयशंकर यांचे मोठे विधान
3
मुंबईतील राजकीय नेत्याच्या मुलाकडून अल्पवयीन मुलीवर अत्याचार, शौचालयात गाठले आणि...
4
गाझातील सत्ता सोडण्यास नकार दिल्यास हमासची धुळधाण उडवू, डोनाल्ट ट्रम्प यांची ताकिद 
5
नेपाळमध्ये हाहाकार... मुसळधार पावसाचा कहर! आतापर्यंत 51 जणांचा मृत्यू; पंतप्रधान मोदींनी व्यक्त केलं दुःख, म्हणाले - भारत...!
6
Muneeba Ali Controversial Run Out : हुज्जत घालून पाक क्रिकेटच्या इज्जतीचा फालुदा; असं काय घडलं?
7
हिमालयात दार्जिलिंगपासून माऊंट एव्हरेस्टपर्यंत विध्वंस, ६० हून अधिक मृत्यू, कारण काय?
8
IND vs AUS : ३०० पारच्या लढाईत अभिषेक-तिलकनं तलवार केली म्यान; वादळी शतकासह प्रभसिमरन सिंगची हवा
9
'जेव्हा शिंदे CM आणि फडणवीस DCM होते तेव्हा...!', अमित शाह यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
10
प्रवाशांनी भरलेली विरार ते पालघर रो-रो बोट जेट्टीवर अडकली; हायड्रॉलिक पाईप तुटल्याने मनस्ताप
11
"काटा मारुन पैसे जमा करता आणि..."; पूरग्रस्तांसाठी मदत न देण्यावरुन CM फडणवीसांचा साखर कारखान्यांना इशारा
12
’अमित शाह महाराष्ट्रात आले पण नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत देण्याबाबत शब्दही बोलले नाहीत’, काँग्रेसची टीका   
13
Irani Cup 2025: नागपूरच्या मैदानात फुल्ल राडा! यश धुलला तंबूत धाडल्यावर ठाकूर त्याच्या अंगावर धावला (VIDEO)
14
ऑटो कंपनीची 'कमाल', गुंतवणूकदारांना केलं मालामाल...! 1 वर्षात पैसा डबल; सोमवारी दिसणार चमत्कार?
15
जळालेल्या चार्जरमुळे सापडला दहशतवाद्यांना मदत करणारा युसूफ; पहलगाम हल्ल्याआधी चारवेळा भेटला
16
जीवघेण्या कफ सिरपचा कहर सुरूच, मध्य प्रदेशात आणखी २ मुलांचा मृत्यू, आतापर्यंत १६ जणांचा गेला बळी
17
IND vs PAK: टॉस वेळी पाकिस्तानी कॅप्टनची चिटिंग? ते हरमनप्रीतलाही नाही कळलं (VIDEO)
18
एक फोन कॉल अन्...! मामे भावाच्या प्रेमात 'पागल' झाली पत्नी, 'लव्ह अफेअरचा चक्कर'मध्ये पतीची निर्घृन हत्या केली! 
19
सयाजी शिंदेंचा मोठा निर्णय, 'सखाराम बाईंडर'च्या १० प्रयोगांचे मानधन पूरग्रस्त शेतकऱ्यांना देणार
20
“धर्म-भाषा काहीही असो, आपण सर्व हिंदू आहोत; ब्रिटिशांनी आपल्यात फूट पाडली”- मोहन भागवत

बांधकाम सुरू करण्यास व्यावसायिक सज्ज; पण परवानगीसाठी प्रशासनात मतैक्य हवे !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 28, 2020 14:39 IST

सोलापूर शहरात २५० कोटींचे प्रकल्प ठप्प; पुणे, मुंबईत हिरवा कंदील; मग सोलापुरात का नाही ?

ठळक मुद्देनोटाबंदी, जीएसटीचा निर्णय आणि रेरा कायदा या तीन बदलांमुळे आधीच बांधकाम क्षेत्राला उतरती कळा आता कोरोनाचे संकट आले असून, त्यामुळे या क्षेत्रासाठी सध्याचा काळ अडचणीचा ठरत आहेगृह, व्यावसायिक तसेच पायाभूत सुविधा अशा सर्वप्रकारच्या बांधकामाच्या साईट्स सध्या बंद आहेत

सोलापूर : मुंबई, पुण्यासारख्या रेडझोनमध्ये बांधकामं सुरू झाली आहेत. सोलापुरात सुरू करण्यासाठी आम्ही सज्ज आहोत; बांधकाम सुरू करण्याच्या परवानगीसाठी प्रशासनात लवकरात लवकर मतैक्य झाले पाहिजे, असे मत शहरातील बांधकाम व्यावसायिकांनी व्यक्त केले असून, बांधकाम मजुरांना लॉकडाऊनच्या  नियमानुसार सर्व सुविधा देण्यास आम्ही तयार आहोत, अशी ग्वाहीही या व्यावसायिकांनी दिली आहे.

लॉकडाऊन ४ मध्ये काही नियम आणि अटी घालून रखडलेले प्रकल्प पूर्ण करण्यासाठी बांधकामास परवानगी दिली आहे. सोलापुरात तर २५० कोटी रूपयांचे १२५ गृहनिर्माण प्रकल्प रखडले आहेत. या स्थितीत मुंबई, पुणे, कोल्हापुरात बांधकामास परवानगी दिली असताना सोलापुरात का दिली जात नाही, असा सवाल ‘क्रेडाई’ ने व्यक्त केला आहे.

नोटाबंदी, जीएसटीचा निर्णय आणि रेरा कायदा या तीन बदलांमुळे आधीच बांधकाम क्षेत्राला उतरती कळा लागली होती. आता कोरोनाचे संकट आले असून, त्यामुळे या क्षेत्रासाठी सध्याचा काळ अडचणीचा ठरत आहे. गृह, व्यावसायिक तसेच पायाभूत सुविधा अशा सर्वप्रकारच्या बांधकामाच्या साईट्स सध्या बंद आहेत. अशातच जिल्हाधिकारी कार्यालय, महापालिका व पोलीस आयुक्त कार्यालय यांच्यात योग्य तो समन्वय नसल्याने बांधकाम परवानगीस वेळ लागत असल्याचेही क्रेडाईच्या पदाधिकाºयांनी सांगितले.

बांधकामं बंद असल्यामुळे त्याच्याशी निगडीत वाळू, विटा, खडी, दगड, मुरूम, डस्ट, सिमेंट कंपन्या, त्यांचे डीलर, किरकोळ विक्रेते, त्याची वाहतूक करणारे हमाल, स्टील इंडस्ट्री, रंग निर्मिती कंपन्या व त्यातील कामगार, विक्रेते, रंगकाम करणारे मजूर, फर्निचर करणारे सुतार, स्टील वर्क करणारे लोहार, टाईल्स, प्लम्बिंग इंडस्ट्री व प्लम्बर, इलेक्ट्रिकल्स साहित्य, इलेक्ट्रिशियन, इंटिरिअर डेकोरेटर्स, काच विक्रेते व त्यावर काम करणारे कारागीरही अडचणीत सापडले आहेत. 

मटेरियलच्या गाड्यांना लागतोय ब्रेक...- परराज्यासह परजिल्ह्यातून अथवा शहरालगत असलेल्या विविध ठिकाणांहून बांधकामासाठी लागणारे वाळू, विटा, सिमेंट, खडी, दगड, मुरूम, डस्ट व इतर अन्य मटेरियलच्या गाड्या पोलीस अडवत आहेत. त्यामुळे बहुतांश मटेरियल घेऊन येणारा ट्रकचालक शहरात येण्यास घाबरत आहे. त्यामुळे बांधकाम साईटवर मटेरियल वेळेत येत नसल्यानेही बांधकामे सुरू करण्यास अडचणी निर्माण होत असल्याची खंत क्रेडाईचे अध्यक्ष शशिकांत जिड्डीमनी यांनी व्यक्त केली.

‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर बांधकामावर मजुरांच्या आरोग्याच्या दृष्टीने मास्क, सॅनिटायझर, टेम्परेचर तपासणी याशिवाय आवश्यक त्या उपाययोजना करू. कोल्हापूर, पुण्यात बांधकामे सुरू झाली; आता सोलापुरातील कधी सुरू होतील, याकडे लक्ष लागून राहिले आहे. नियम, अटींच्या अधीन राहून कामे करू. बांधकाम व्यवसाय हा देशातील दुसºया क्रमांकाचा जीडीपी देणारा सेक्टर आहे. तसेच व्यवसायात कामगारांचा मोठा समावेश आहे. त्यामुळे त्वरित बांधकामास परवानगी द्यावी.- सुनील फुरडे, उपाध्यक्ष, क्रेडाई संघटना, महाराष्ट्र राज्य.

पालकमंत्री, जिल्हाधिकारी, पोलीस आयुक्त, महापालिका आयुक्तांना निवेदन दिले. मात्र, अद्याप तरी बांधकाम सुरू करण्यास कुणाकडूनही परवानगी अथवा त्या संदर्भातील आदेश प्राप्त झाला नाही. दरम्यान, परप्रांतीय मजुरांनी सोलापूर सोडल्यामुळे बांधकाम क्षेत्रातील कामे आता संथगतीने चालतील. आम्ही कामगारांना मास्क, सॅनिटायझर, आरोग्य तपासणी करून कामावर घेऊ, आवश्यक त्या आरोग्याच्या दृष्टीने काळजी घेऊ. बांधकामे सुरू करण्यास परवानगी द्यावी.-शशिकांत जिड्डीमनी,अध्यक्ष, क्रेडाई सोलापूर शाखा.

टॅग्स :Solapurसोलापूरcorona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस