शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

दूध दरवाढ देणे खासगी संस्थांसाठी अडचणीचे ठरणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2018 13:37 IST

संकलन व विक्रीत पारदर्शकता ठेवण्याचे मोठे आव्हान पेलावे लागणार

ठळक मुद्देखासगी संघांवर राज्य शासनाचे कायद्यानुसार कसलेही नियंत्रण नाहीभारताबाहेर दूध भुकटी निर्यात केल्याचे सिद्ध करण्याची जबाबदारी अनुदान मागणाºयांवर सोपवली

सोलापूर: हळूहळू दूध उत्पादकांच्या खात्यावर अनुदान जमा करण्यावर शासनाचा भर राहण्याची शक्यता असल्याने पारदर्शक व्यवहाराला येणाºया अडचणी लक्षात घेऊन खासगी दूध संघ कारणे दाखवून यामध्ये भाग घेण्यासाठी अर्जच देण्याच्या मनस्थितीत नाहीत. शासनाच्या या निर्णयावरील अडचणीसंदर्भात दुग्धविकास आयुक्तांकडे बैठकही झाली आहे.

राज्यात गाईच्या दुधाचा खरेदी दर प्रति लिटर १५ व १७ रुपयांवर आल्याने शेतकरी अडचणीत आला आहे. यामुळे स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आंदोलन सुरू केल्यानंतर शासनाने दूध खरेदी दर प्रति लिटर २५ रुपये करण्याचा निर्णय घेतला. २१ जुलैपासून ही दरवाढ करण्याचा आदेश काढला. त्यात अनेक अटी घातल्याने खासगी संघांपुढील अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.

यामुळे मुख्यमंत्र्यांकडील बैठकीत होकार देणाºया खासगी संघचालकांची कुरकुर सुरू आहे. त्यातच केंद्र शासनाने फॅट ३:२ व एस.एन.एफ. ८:३ पर्यंतचे दूध स्वीकारण्याचे आदेश काढले आहेत. असे असताना २० जुलै रोजीच्या मुख्यमंत्र्यांकडील बैठकीत ठरल्याप्रमाणे फॅट ३:५ व एस.एन.एफ़.८:५ पेक्षा खालील दूध जप्त करण्यात येईल, असे परिपत्रकच सर्वच खासगी संघांनी संकलन केंद्रासाठी २१ जुलै रोजी काढले होते.

त्यानंतर राज्य शासनाने काढलेल्या आदेशात तीन महिन्यांसाठी निर्यात होणाºया दूध व दूध भुकटीसाठी हा आदेश असून, प्रतिसादावर पुढील निर्णय घेतला जाणार असल्याचे म्हटले आहे़ भारताबाहेर दूध भुकटी निर्यात केल्याचे सिद्ध करण्याची जबाबदारी अनुदान मागणाºयांवर सोपवली आहे़ अनुदान मागणीचे प्रस्ताव आयुक्तांनी तपासावयाचे आहेत. पिशवीबंद दूध व दुग्धजन्य पदार्थांसाठी वापरल्या जाणाºया दुधाला कोणतेही अनुदान मिळणार नाही,

मात्र दूध उत्पादकांना प्रति लिटर २५ रुपये दर देण्याचे बंधनकारक करण्यात आले आहे. या योजनेत सहभागी होण्यासाठी संबंधित संस्थांनी प्रादेशिक दुग्धविकास अधिकाºयाकडे नोंदणी करावयाची आहे. याशिवाय शेतकºयांना प्रति लिटर २५ रुपये दर देत असल्याचे हमीपत्र द्यावयाचे आहे.

आज शासन पाच रुपयांचे अनुदान संस्थांना देणार असले तरी काही दिवसांनी थेट दूध उत्पादकांच्या खात्यावर जमा होणार असल्याने शेतकºयांच्या नोंदी ठेवणे खासगी संघांसाठी अडचणीचे ठरण्याची शक्यता आहे. या सर्व बाबी लक्षात घेऊन मंगळवारी दुग्ध विकास आयुक्तांकडे राज्यातील संघ चालकांची बैठक झाली असून, त्यामध्ये ३:२ व ८:३ पर्यंतचे दूध स्वीकारण्यावर चर्चा झाली. यामुळे शेतकºयांना प्रति लिटर २५ रुपयांचा दर २१ जुलैपासून मिळण्याची शक्यता कमीच आहे. आयुक्तांच्या बैठकीत १ आॅगस्टपासून दूध दरवाढ देण्याबाबत एकमत झाले असले तरी शासन आदेश निघण्यावर अवलंबून आहे.

अनुदानासाठी दप्तराचे ओझे- सहभागी होणाºया संस्थांनी दूध खरेदी व विक्रीबाबतचे अभिलेख दररोज अद्ययावत ठेवणे तसेच जिल्हा दुग्ध विकास अधिकाºयांकडे देणे बंधनकारक केले आहे़ अतिरिक्त दूध रुपांतरासाठी दिल्याबाबतचा अहवालही दररोज द्यावा लागणार आहे. याची तपासणी करण्यासाठी भरारी पथकांची निर्मिती करण्यात येणार आहे. यामध्ये अनियमितता आढळलेल्या संस्थांना अनुदानाला मुकावे लागणार आहे. याशिवाय खासगी संघांवर राज्य शासनाचे कायद्यानुसार कसलेही नियंत्रण नाही. 

टॅग्स :SolapurसोलापूरmilkदूधMilk Supplyदूध पुरवठा