शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
4
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
5
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
6
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
7
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
8
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
9
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
10
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
11
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
12
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
13
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
14
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
15
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
16
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
17
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
18
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
19
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
20
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."

पत्नीच्या नावाखाली सोलापुरातील सरकारी डॉक्टरांची खासगी प्रॅक्टिस जोमात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 28, 2020 13:08 IST

बिनधास्तपणे ओपीडी अन‌् आंतररुग्ण सेवा  : व्यवसायरोध भत्ता घेऊनही खासगी सेवा

सोलापूर :   सार्वजनिक आरोग्य विभागासह शासकीय  रुग्णालयातील  डॉक्टरांना व्यवसायरोध भत्ता दिला जातो. तरीही काही डॉक्टर हे खासगी रुग्णालयात प्रॅक्टिस करत आहेत. 

शासकीय रुग्णालयात कार्यरत असणाऱ्या डॉक्टरांना दर महिन्याला सुमारे दीड लाख रुपये वेतन दिले जाते. तसेच खासगी प्रॅक्टिस करु नये म्हणून वेतनाच्या ३५ टक्के व्यवसायरोध भत्ता (एनपीए) दिला जातो. परंतु, काही डॉक्टर हे खासगी रुग्णालयात बिनधास्तपणे ओपीडी,  आंतररुग्ण सेवा देत आहेत. काहीजण केवळ शस्त्रक्रियेपुरते जातात. आपले नाव येऊ नये याची काळजी घेतली जाते. मात्र,  अशा प्रकारच्या सेवा देतानाचे छायाचित्र, अन्य पुरावा मिळत नसल्याने कारवाईला अडचणी येत असल्याचे प्रशासनाचे म्हणणे आहे. तसेच खासगी रुग्णालयात प्रॅक्टिस करण्याच्या उद्देशाने काही जण न्यायालयात गेले असल्याचे सांगण्यात आले.

खासगी डॉक्टरांसोबत प्रॅक्टिसशासकीय रुग्णालयात सेवा करत असताना पुणे रोड परिसरात या डॉक्टरांची प्रॅक्टिस सुरु आहे. दवाखान्यावर पत्नीचे नाव सुरुवातीला लावून खासगी प्रॅक्टिस  सुरु आहे. फक्त एकच नव्हे तर तीन ते चार विविध शाखेतील डॉक्टर घेऊन हे शासकीय सेवेतील डॉक्टर उपचार करत आहेत.

मध्यवर्ती भागात रुग्णालयशहराच्या मध्यवर्ती भागात शासकीय सेवेतील हे डॉक्टर प्रॅक्टिस  करत आहेत. सोबतच एक पॅथॉलॉजी प्रयोगशाळा सुरु करण्यात आली आहे. येथे विविध प्रकारच्या चाचण्या होतात. हॉस्पिटलच्या दर्शनी भागात स्वत:च्या नावासोबत डॉक्टर पत्नीचेही नाव लिहिण्यात आले आहे.

फलकावर झळकते नावशासकीय सेवेत कार्यरत असणारे हे डॉक्टर सात रस्ता परिसरात सेवा देत आहेत. पत्नी स्त्रीरोगतज्ज्ञ असून त्यासंबंधी उपचार या खासगी रुग्णालयात सुरु आहेत. शासकीय सेवेत असणारे डॉक्टर हे शस्त्रक्रिया करत असल्याचा फलक या रुग्णालयासमोर लावण्यात आला आहे.

मोठ्या खासगी रुग्णालयातही देतात सेवा

  • - पूर्वी काही अटींनुसार शासकीय सेवेतील डॉक्टरांना खासगी सेवा देण्याची मुभा देण्यात आली होती. याचे दुष्परिणाम दिसत असल्याने ही सवलल बंद करण्यात आली. तसेच डॉक्टरांना वेतनाच्या ३५ टक्के व्यवसायरोध भत्ता देण्याचा नियम करण्यात आला. जुना नियम असताना आम्ही रुग्णालय सुरु केले. आता नव्या नियमामुळे आमचे रुग्णालय बंद कसे करायचे ? हा प्रश्न घेऊन काही डॉक्टर न्यायालयात गेले. त्यामुळे काही डॉक्टर हे खासगी डॉक्टर सेवा देत आहेत.
  • -  शहरात असणाऱ्या मोठ्या रुग्णालयात प्रत्यक्ष सेवा देत नसले तरी फक्त शस्त्रक्रियेसाठी जाणारे डॉक्टर आहेत. फोनवरुन कधी जायचे हे ठरवून शस्त्रक्रिया पार पाडली जाते. त्यामुळे कोणत्या डॉक्टराने शस्त्रक्रिया केली हे गुलदस्त्यात ठेवले जाते. शासनाने वेतन देऊनही असे प्रकार घडतात. रुग्णालय चालक व डॉक्टर यांच्या संगनमताने हा प्रकार सुरु असल्याचे रुग्णसेवेशी संबंधित एका तज्ज्ञाने नाव न घेण्याच्या अटीवर सांगितले.
टॅग्स :Solapurसोलापूरdocterडॉक्टरHealthआरोग्यMedicalवैद्यकीय