खाजगी रूग्णालयांनी बेडची संख्या वाढवावी : शंभरकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2021 04:22 IST2021-03-31T04:22:43+5:302021-03-31T04:22:43+5:30

कोरोना संसर्ग रोखण्यासाठी करण्यात येणाऱ्या उपाययोजनेबाबत पंढरपूर येथे बैठक पार पडली. यावेळी ते बोलत होते. बैठकीस जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. ...

Private hospitals should increase the number of beds: Shambharkar | खाजगी रूग्णालयांनी बेडची संख्या वाढवावी : शंभरकर

खाजगी रूग्णालयांनी बेडची संख्या वाढवावी : शंभरकर

कोरोना संसर्ग रोखण्यासाठी करण्यात येणाऱ्या उपाययोजनेबाबत पंढरपूर येथे बैठक पार पडली. यावेळी ते बोलत होते. बैठकीस जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. प्रदीप ढेले, मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी विठ्ठल जोशी, तहसीलदार सुशील बेल्हेकर, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. मोहन शेगर, उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ. अरविंद गिराम, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. एकनाथ बोधले यांच्यासह खाजगी रुग्णालयाचे डॉक्टर उपस्थित होते.

कोरोनाबाधित रुग्णांच्या उपचारासाठी खासगी व शासकीय रुग्णालयात आरोग्य सुविधा, मुबलक औषधसाठा, ऑक्सिजन पुरवठा उपलब्ध ठेवावा. शहरी व ग्रामीण भागात चाचण्यांची संख्या वाढवावी. संपर्क साखळी तोडण्यासाठी संपर्कातील व्यक्तींचा शोध घेऊन तात्काळ तपासणी करावी. खाजगी रुग्णालयांनी महात्मा फुले जन आरोग्य योजनेतंर्गत जास्तीत-जास्त रुग्णांना लाभ मिळवून द्यावा, अशा सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी केल्या.

Web Title: Private hospitals should increase the number of beds: Shambharkar